चंद्रपूर - सोमवार 17 जानेवारीपासून चंद्रपूर जिल्ह्यात लागू झालेली हेल्मेटसक्ती संदर्भात चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हेल्मेटसक्ती लागू झाल्यावर शहरातील नागरिक संभ्रमात आले होते की ही सक्ती शहरात पण लागू होणार की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला होता.
आधी पोलीस प्रशासन, नंतर इतर शासकीय विभागातील कर्मचारी व अखेर नागरिकांना हेल्मेट परिधान करावेच लागेल. Wear helmet
मात्र 18 जानेवारीला जिल्हा पोलिस अधिक्षक व वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक यांनी सदर सक्ती ही शहराला जोडणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गासाठी लागू असणार आहे. Follow traffic rules
शहरातील नागरिकांना दिलासा देणारी ही बातमी असली तरी स्वतःला अपघातापासून वाचवायचे असेल तर हेल्मेट परिधान करायलाच हवे.