News34 chandrapur
चंद्रपूर -: अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या अध्यक्षा नेत्ता डीसुजा यांच्या मार्गदर्शनानुसार त्याच बरोबर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांच्या सूचनेनुसार दिनांक २८ सप्टेंबर ला घुग्गुस येथे महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी हेल्प लाईन नंबर चे उदघाटन काँग्रेस च्या जुन्या कार्यकर्त्या दुर्गा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या अध्यक्षा नेत्ता डीसूजा यांनी संपूर्ण भारतात महिलांच्या मदतीसाठी स्त्री 1800-203-0589 हा toll free नंबर जारी केला आहे. संपूर्ण देशामध्ये महिला काँग्रेस कडून हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महिलांना कायदेविषयक तसेच आरोग्य विषयक सल्ला मोफत मिळण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा उपयोग होणार आहे.
Free legal advice
अनेकदा महिलांना कायदेशीर मदत योग्य पद्धतीने मिळत नाही तसेच आरोग्य विषयक माहिती पण योग्य वेळी मिळत नाही. अशा महिलांना आता या क्रमांकावरुन त्यांना भेडसवणाऱ्या समस्या दूर करता येईल. हा केवळ एक नंबर नसून स्त्री सशक्तीकरणा साठी महिला काँग्रेस ने उचलले पाऊल आहे. त्या मुळे या टोल फ्री क्रमांक चा उपयोग अधिकाधिक महिलांनी करावा असे आवाहन चंद्रपूर महिला काँग्रेस (ग्रामीण) अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी यावेळी केली.
Mahila congress
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या सह जिल्हा उपाध्यक्षा शितल कातकर, जिल्हा सचिव मंगला शिवणकर, जिल्हा सचिव मेहेक सय्यद, श्रीराम बचत गटाच्या संचालिका पदमा त्रिवेणी, संध्या मंडल, अमिना बेगम, लक्ष्मी गोदारी, श्रीलता सोनारे यांच्या सह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.