News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरात 18 ऑक्टोम्बरला कस्तुरबा मार्गावर श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल चे उदघाटन सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आले. Rinku Rajguru in chandrapur
सकाळी 10.30 वाजता शॉपिंग मॉल चे उदघाटन होणार होते मात्र कार्यक्रमाला उशीर झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली, इतकेच नव्हे, नागरिकांची वाढलेली गर्दी बघता पोलिसांना वाहतुकीच्या मार्गात बदल करावा लागला. Shopping mall
ज्यूबली शाळेतील चौकात पोलिसांनी बॅरिकेट्स लावत संपूर्ण मुख्य मार्ग बंद केला, उदघाटन सोहळ्याचा नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला.
आधीच शहरात वाहनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, वाहतुकीवर नियंत्रण नाही, शहरातील रस्ते अरुंद असल्याने मोर्चा, मिरवणूक निघाल्यास वाहतूक व्यवस्था कोलमडून जाते.
अश्यातचं शहरात सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु येणार असल्याने नागरिकांनी अक्षरशः रस्त्यावर गर्दी केली.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी बंदोबस्त लावला मात्र त्यानंतरही संपूर्ण यंत्रणा ढेपाळली.