News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील मोठ्या पदावर असलेला अधिकारी हनीट्रॅप मध्ये अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. Honey trap in chandrapur
मागील 7 महिन्यांपूर्वी सदर अधिकाऱ्याला एका महिलेने बोलावीत एक महिला आपल्याला भेटू इच्छिते असे सांगत त्या अधिकाऱ्याला बोलाविले.
त्यानंतर दोघांची भेट करीत दुसऱ्या रूम मध्ये नेले त्याठिकाणी दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. Chandrapur crime
मात्र घडलेला सर्व प्रकार छुप्या कॅमेऱ्याने अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.
सदर बाब काही दिवसांनी एका महिलेने त्या अधिकाऱ्याला सांगितली मात्र प्रकरण निपटवण्यासाठी 3 लाख रुपये देत सेटलमेंट झाले.
6 महिन्यांनंतर पुन्हा त्या अधिकाऱ्याला एका अज्ञात इसमाने कॉल करीत ते अश्लील व्हिडीओ व्हायरल करतो असे सांगितले जर ते व्हिडीओ सार्वजनिक करायचे नसतील तर तुम्हाला 50 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली.
सदर प्रकाराला त्रासत त्या अधिकाऱ्याने पोलिसात दाद मागितली. Chandrapur police
या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने सदर खंडणीखोर यांचेवर सापळा रचून कारवाई केली. Chandrapur breaking news
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सादिक खान व झिबल भारसाखरे यांना ताब्यात घेतले आहे, धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात 3 महिलांचा समावेश असे बोलल्या जात आहे. Extortion
सदर प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.