bharat gaurav award : चंद्रपूर : सामाजिक सेवा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदान आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत इंटरनॅशनल अवॉर्ड कौन्सिलतर्फे सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी वरोरा विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. रमेश महादेवराव राजूरकर यांना ‘भारत गौरव प्रतिभा रत्न अवॉर्ड ’ देवून सन्मानित करण्यात आले. (कोरपना तालुक्यातील श्वेता ची केम्ब्रिज मध्ये पदवी)
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. राजूरकर यांना पदक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. रमेश राजूरकर यांनी अनेक वर्षांपासून समाजसेवा, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
हा सन्मान माझा नसून समाजसेवेच्या कार्यात सहभागी प्रत्येक सहकाऱ्यांचा आहे. भविष्यातही समाजहितासाठी कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार आहे.
डॉ. रमेश राजूरकर,
सामाजिक कार्यकर्ते, वरोरा
Leave a Comment