आईने दिली तक्रार: अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवले?

May 24, 2026 by Prakash Hande

chimur missing girl : चिमूर - मुलगी दहावी पास झाली, आई-वडिलांनी पुढच्या शिक्षणाकरिता मुलीने महाविद्यालयात प्रवेश घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली, मात्र २२ मे रोजी मुलगी घराबाहेर गेली पण ती परत आलीच नाही. याबाबत आईने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. (अल्पवयीन मुलीचे शोषण, आरोपीला अटक)

 

नुकताच दहाव्या वर्गाचा निकाल जाहीर झाला, त्या परीक्षेत १५ वर्षे ११ महिन्याची मुलगी पास झाली, आता पुढील शिक्षण महाविद्यालयात घेण्याची तयारी सुरु होती, कामानिमित्त वडील बाहेरगावी राहतात तर अल्पवयीन मुलगी व भाऊ हे दोघे आईजवळ राहत होते.

 

२२ मे ला मुलीने दुकानातून काही वस्तू आणायच्या आहेत म्हणून आईला पैसे मागितले, शुक्रवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने आईने मुलीला पैसे दिले. मुलगी दुकानात गेली तर आई आठवडी बाजारात निघाली. सायंकाळी ७ वाजता आई घरी आली, घरी मुलगी न दिसल्याने आईने मुलाला विचारणा केली असता ती मैत्रिणीकडे आहे असे सांगितले.

 

आईने मुलीला कॉल केला, मी मैत्रिणीकडे आहे मात्र ती कोणत्या मैत्रिणीकडे आहे असे न सांगता फोन बंद केला, त्यानंतर मुलगी घरी आलीच नाही, आईने इतरत्र मुलीचा शोध घेतला. मुलगी न मिळाल्याने याबाबत चिमूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने फूस लावत मुलीला पळविले अशी तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरु केला.

 

Leave a Comment

+