मुलांनी मैदान मारलं, तर मुलींनीही गाजवलं! टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चंद्रपूरच्या खेळाडूंचा सुवर्ण पराक्रम

February 23, 2026 by Prakash Hande

Chandrapur Cricket News : चंद्रपूर : विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशननागपूर (वि.टी.बी.सी.ए.) अंतर्गत २५ वी सिनीयर व २० वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच एन.एम.सी. स्पोर्ट्स ग्राउंडरामनगरनागपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमधून सुमारे ४०० पेक्षा अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या २५व्या सिनीयर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूरच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. (महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात मुनगंटीवारांचा रेकॉर्ड)

 

या संघाचे नेतृत्व सुरज परसूटकर यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तसेच सिनीयर मुलींच्या संघानेही कु. रुचिता आंबेकर हिने संघाचे प्रभावी नेतृत्व करत हिच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे ज्युनियर मुलींच्या गटात चंद्रपूर जिल्ह्याच्या संघानेही चांगली कामगिरी बजावत तृतीय क्रमांक पटकावला.

 

          चंद्रपूर जिल्ह्याच्या या यशाबद्दल खेळाडूप्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.सदर खेळाडूंना प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून चंद्रपुर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचंद्रपुरचे  सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले. प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या प्रशिक्षणात व वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आज पर्यंत अनेक खेळाडुंना यश व प्राविण्य प्राप्त झाले.

 

                    सदर स्पर्धेतील यशाबद्दल विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मा. अजय हिवरकरसचिव मा. राजकुमार कैथवास तसेच दि. चंद्रपुर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचंद्रपुरचे अध्यक्ष मा. डॉ. अनिस अहमद खानउपाध्यक्ष मा. डॉ. विशाल शिंदेश्री. पुरुषोत्तम आगलावेसचिव प्रा .विक्की तुळशीराम पेटकरसहसचिव श्री. सूरज परसुटकरसंस्थेचे सल्लागार मा. डॉ. महेशचंद शर्माकोषाध्यक्ष कु. रुचिता आंबेकरसहकोषाध्यक्ष कु. श्रुती घटेसदस्य सौ. वर्षा घटेहर्षल क्षिरसागरबंडू डोहेइखलाक पठानचंद्रकांत परसूटकर तसेच डॉ. पुरुषोत्तम माहोरेडॉ.निखिल देशमुखडॉ. सुनील चिकटे यांनी सुध्दा खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले .

Leave a Comment

+