Thursday, April 25, 2024
Home Blog

Lok Sabha Election Voting : रिल्स स्पर्धेत चिमूर का छोकरा आशिष बोबडे प्रथम

0

Lok Sabha Election Voting लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  – 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले.

सर्वसामान्य पालकांचा अधिकार – RTE कायद्याचे बदलले नियम

या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे.

 

सन 2019 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावा, लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले. Lok Sabha Election Voting

 

तरुण मतदारांमध्ये रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् बाबत असलेली प्रचंड उत्सुकता पाहता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी ‘माय व्होट इज माय फ्युचर, पॉवर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करणे, तसेच ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या थीमवर आधारीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करून फोटो अपलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. Lok Sabha Election Voting

 

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लकी ड्रा काढतांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते. Lok Sabha Election Voting

 

हे आहेत स्पर्धेतील विजेते मतदार : मतदान केंद्रासमोर Selfie क्लिक करणे

            या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र देवराव पोहाणे, रा. तुकुम चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत मधुकर गेडाम, रा. मूल यांना तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक ऋषी बारसागडे, रा. चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

 

            Reels स्पर्धा : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडे, रा. टिळक वॉर्ड, बालाजी मंदीरजवळ, चिमूर यांना, द्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकर, रा. पालगाव, पो. आवाळपूर, ता. कोरपना यांना, तृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमील ज्ञानेश्वर मडावी, रा. वॉटर सप्लाय कॉर्टर, गोपालनगर, तुकुम, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

 

            Posters स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश यशवंत निकोडे, रा. नेहरू नगर, नवीन वस्ती, डीआरसी रोड, चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल राजू धोगडे, रा. शासकीय कन्या वसतीगृह, भिवकुंड (विसापूर) यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी राजू मिलमिले, रा. तिलक वॉर्ड, बोर्डा, ता. वरोरा यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

 

            Mems स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन संतोष येलमुले, रा. सुब्बई, ता. राजुरा यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय बाबुराव सोनुने, रा. हुडको कॉलनी, अमर चौक, चंद्रपूर यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप रंगलाल शाहा, रा. मच्छीनाला, मुक्तीकॉलनी, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

Mul City Bus Station : मूल बस स्थानकावर प्रवाशांचे हाल बेहाल

0
Mul city

गुरू गुरनुले

Mul City Bus Station मुल – स्वच्छ सुदंर शहर म्हणून ओळख असलेल्या मुल शहरात कोटी रुपये खर्च करुन बसस्थानक बांधण्यात आले. तरी देखील अन्य सोई सुविधा, कर्मचाऱ्यांची कर्तव्यात कुचराई मात्र अजूनही कायम असल्याने रात्रीच्या वेळेला प्रवाशी बांधव महिला व शाळेच्या विद्यार्थ्यांचे बेहाल होत असल्याचे अडून राहिलेल्या ग्रामीण प्रवाशी बांधवांनी बोलून दाखविले आहे.

 

दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८-३० वाजता गोंडपीपरी मार्गाकडे जाणारी बस रात्री ८ वाजता यायला पाहिजे परंतु ती बस रात्री ९-४० नंतर आल्याने तोपर्यंत शाळेचे विद्यार्थी व लग्नकार्यालां आलेले जूनासूर्ला,व त्यामार्गावरील असंख्य प्रवासी बसस्थानकावर अडून पडल्याने बिचाऱ्या प्रवाशी बांधवांचे बेहाल झाल्याचे प्रवाशी बांधवांनी बोलून दाखविले आहे. Mul City Bus Station

Rte – RTE चे नवे नियम पालकांना त्रासदायक

वाहतूक नियंत्रक गायब

मुल हे मध्यवर्ती बसस्थानक असल्याने याठिकाणी वाहतूक नियंत्रक यांची ड्युटी सकाळी ५ ते दुपारी १४ नंतर दुपारी १४ ते रात्री २२(१०) पर्यंत असल्या नंतरही ज्या कुणाची ड्युटी आहे तो वाहतूक नियंत्रक रात्री ८ वाजताच घरी निघून जात आहे. त्यामुळे बसस्थानकावर असणाऱ्या प्रवाशांनी कुणाकडून बसची चौकशी करावी असा प्रश्न प्रवाशांना पडला. Mul City Bus Station

 

चंद्रपूर – गडचिरोली मार्गाच्या बसेस रात्री १० वाजेपर्यंत येतात तेव्हा स्थानकावर कोणीही जबाबदार व्यक्ती दिसून येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग स्थांनकावरची वाहतूक व्यवस्था कोण पाहणार.? असा प्रश्न पडतो. Mul City Bus Station

 

विभागीय नियंत्रक व आगार व्यवस्थापकांनी लक्ष द्यावे

मुल शहरातील नगराच्या मध्यभागी असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची,ग्रामीण नागरिकांची किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांची तक्रार असतेच. मुल येथील बसस्थानकावर प्रवाशी वाहतुकीबाबत चंद्रपूर जिल्हा विभागीय नियंत्रकांना दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. तसेच आगार व्यवस्थापकांनी सुद्धा मूलच्या बसस्थानका कडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

Desecration of statue of Mahatma Phule : त्या समाजकंटकांना अटक करा

0
Chandrapur district

गुरू गुरनुले

Desecration of statue of Mahatma Phule मुल – ज्या महापुरुषांच्या विचारानेच देशाची लोकशाही टिकली आहे अशाच महात्म्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे. तरी देखील केंद्र व राज्य सरकार गप्प आहे. २१ एप्रिल २०२४ रोजी यवतमाळ येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्यांची शाही फेकून विटंबना केली.त्याचा शोध घेऊन अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांचेकडे समाज संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

कायदा मोफत शिक्षणाचा : RTE च्या नव्या नियमविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

माळी महासंघ,समता परिषद, अ.भा.मां.संघ,सावित्रीबाई फुले विकास संस्था, समजोठ्त्थाण मंडळ,महिला गट, ओबीसी व बहुजन समाजाच्या वतीने गांधी चौक मुल येथे निषेध करुन निवेदन देण्यात आले. Desecration of statue of Mahatma Phule

Mahatma phule

निवेदन देताना माजी.जी.प.सदस्य,प्रा.रामभाऊ महाडोरे, माजी प्राचार्य बंडू गुरनुले,माळी महासंघाचे विभागीय महासचिव व तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, प. स.सदस्य डॉ.पद्माकर लेंनगुरे, माजी उपाध्यक्ष चंदू चटारे, भाजपा युवा अध्यक्ष राकेश ठाकरे,स.म.अध्यक्ष प्रा.सुधीर नागोशे, कार्याध्यक्ष शशिकला गावतूरे, माजी सभापती केमदेव मोहूरले, हसन वाढई, डॉ.राकेश गावतूरे ,दीपक वाढई, सरपंच नितीन गुरनूले, राकेश मोहूरले, आनंद गोंगले, अरुण ढोले,सचिन पुल्लावार, चित्तरंजन वाढई,बाळकृष्ण निकोडे, प्रवीण मोहुरले,बालाजी लेंनगूरे, रवी खोब्रागडे, मंगेश शेंडे,सचिन आंबेकर, विवेक मांदाडे, ओमदेव मोहुर्ल, निखिल वाढई, सत्यवान मोहूर्ल,सुनील कावळे, देवराव गुरनुले,राकेश पुंनावार, रेखा चौधरी, शामला बेलसरे, पापिता मंदाडे, जयश्री कावळे, सीमा लोनबले, प्रमिला शेंडे,प्रदीप वाढई, परशुराम शेंडे, रामदास गुरनुले,श्रीरंग नागोशे,नामदेव वाढई,उमेश ढोले यांचेसह अनेक ओबीसी बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

Right To Education New Rules : RTE कायद्याच्या नव्या नियमांमुळे पालकांमध्ये संभ्रम

0
RTE new rules

Right to education new rules  वर्ष 2009 मध्ये मनमोहन सिंग काळात सुरू झालेला शिक्षणाचा अधिकार RTE ची सुरुवात झाली होती, मात्र वर्ष 2024 मध्ये महायुती सरकारने या कायद्याची पायमल्ली करीत नियमात मोठे बदल केले आहे.

काळाबाजार | दलाल असे करतात रेल्वे तिकिटांची बुकिंग

मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र अर्ज प्रक्रियेत मोठा घोळ असल्याने पालक वर्ग संभ्रमाच्या अवस्थेत आला आहे, अर्ज भरताना 10 शाळा निवड करायच्या आहे मात्र ऑनलाइन प्रक्रियेत इंग्रजी शाळा दाखवीत नाही आहे. Right to education new rules

महत्वाची बातमी – चंद्रपूर मनपा आयुक्त बनले, CISF अधिकारी आणि….

 

शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील आरटीई प्रवेशांसाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार एक किलोमीटरच्या परिघात महापालिकेची शाळा असेल तर त्याच शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानुसार खासगी शाळांऐवजी प्राधान्याने शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसलेल्या भागातच खासगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे. मात्र, अर्ज करताना निवडायच्या शाळांमध्ये एकही इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश नसल्याचे समोर आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. Right to education new rules

 

आठवडाभरात चंद्रपूर जिल्ह्यातून केवळ 150 ऑनलाइन अर्ज

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता जिल्ह्यातील एक हजार ८४६ शाळांची नोंदणी केली होती. या शाळेमध्ये १५ हजार ६२५ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवण्यात आल्या आहे. आरटीई प्रवेशासाठी १६ एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ एप्रिलपर्यंत ऑनलाइन 150 अर्ज करण्यात आल्याची पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. मात्र अजूनही सदर अर्ज सबमिट करण्यात आले नाही. Right to education new rules

 

पालकांमध्ये संताप

खासगी शाळांचे शुल्क मोठ्या प्रमाणात असते. त्यातच आरटीईमुळे वंचित घटकांतील मुलांना दिलासा मिळत होता. मात्र, आता ऑनलाइन अर्ज भरताना फक्त मराठी शाळांचा समावेश दिसून येत आहे. इंग्रजी माध्यमांची एकही शाळा उपलब्ध नाही. जर मराठी शाळेतच आरटीईमधून प्रवेश मिळत असेल तर त्यापेक्षा सरळ मराठी शाळेत प्रवेश घेणे सोयीचे ठरेल. आरटीईमध्ये अर्ज करून पैसे खर्च करण्यात अर्थच काय, असा प्रश्न पालक करत आहेत. Right to education new rules

Rte च्या ऑनलाइन पोर्टल मध्ये खाजगी इंग्रजी शाळांच्या समोर self finance available असा पर्याय दाखवीत आहे, मात्र त्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा याचा पर्याय दिसत नसल्याने, आता प्रवेश घ्यायचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

उच्च न्यायालयात याचिका दाखल

महायुती सरकारच्या या बदललेल्या नियमामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांच्या प्रवेशाची वाट खडतर झाली आहे, या बदललेल्या नियमांना ऍड जयेश कोठारी, चंद्रपूरचे ऍड दीपक चटप, ऍड पायल गायकवाड, ऍड ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कांबाबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

 

उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला नोटीस बजावीत 8 मे पर्यंत उत्तर मागविले आहे.
ऍड दीपक चटप यांनी याबाबत माहिती दिली की सरकारच्या नियमांमुळे खासगी इंग्रजी शाळा ही श्रीमंतांच्या मुलांसाठी तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होणार, याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश व उत्तर प्रदेश आदि राज्यात खासगी शाळांना मुभा देणारे नियम स्थानिक सरकारने तयार केले होते, त्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान देत सदर नियम रद्द केले, 2009 च्या rte कायद्यानुसार खासगी शाळांना मुभा देता येत नाही, खासगी शाळांना वेळेवर परतावा दिल्यास त्यांचा विरोध होणार नाही, राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे मत याचिकाकर्ता तर्फे ऍड दीपक चटप यांनी मांडले आहे.

Railway ticket brokers : रेल्वे तिकिटांचा गोरखधंदा

0
Indian railways

Railway ticket brokers सध्या रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी खूप वाढली आहे. कुठेही जायचं असलं तरी कोणत्याही कोट्याशिवाय कन्फर्म तिकीट मिळेलच याची शाश्वती नाही. यामुळेच आता लोकांना शेवटच्या क्षणी अडचण येऊ नये म्हणून 2-3 महिने आधीच रेल्वे तिकीट बुक करावे लागते. जेव्हा तुम्ही काउंटरवर जाता किंवा स्वतः तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ही समस्या अनेकदा उदभवते. पण जी तिकिटे मिळत नाहीत ती दलालांकडे सहज उपलब्ध होतात हे तुमच्या लक्षात आले असेलचं.

ऐतिहासिक बातमी – चंद्रपुरात 25 हजार वर्षापूर्वी च्या वस्तीचे पुरावे

ट्रेनमध्ये प्रतीक्षा यादी कितीही लांब असली तरी काही मिनिटांत दलाल तिकीट कन्फर्म करतात. मात्र, यासाठी प्रवाशांकडून दुप्पट किंवा तिप्पट दर आकारले जातात. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षा करून दलाल तिकीट कसे कन्फर्म करतात हा प्रश्न आहे. त्यामुळे यामागे एक युक्ती आहे. Railway ticket brokers

गुन्हेगारी – रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, चंद्रपुरात 14 दलालांना अटक

या युक्तीबद्दल जाणून घेऊया.

 

तिकीट इतर कोणत्याही नावाने बुक केले असल्यास, तिकिटावर तुमचे नाव नसण्याची 100 टक्के शक्यता आहे. त्याऐवजी ब्रोकर तुम्हाला सांगेल की TTE ID मागणार नाही.

शिक्षणाची बातमी – RTE च्या नियमात मोठा बदल, पालक संभ्रमावस्थेत

वास्तविक, दलाल तिकीट काउंटरवरून वेगवेगळ्या नावाने तिकीट बुक करतात. तुम्ही त्याला कोणत्याही ठिकाणी कन्फर्म केलेले तिकीट मागितल्यास तो दुप्पट पैसे घेतो आणि तुम्हाला तिकीट देतो आणि म्हणतो की TTE तुमचा आयडी विचारणार नाही तर फक्त तुमचे नाव कन्फर्म करण्यासाठी विचारेल. कारण तिकीट काउंटरवरून घेतलेल्या तिकिटांसाठी आयडी विचारला जात नाही. म्हणूनच दलाल तुम्हाला बदललेले नाव सांगण्यास सांगतात. Railway ticket brokers

 

तुमचे नशीब चांगले असेल, तर यादीत तुमचे नाव पाहूनच TTE पुढे जाईल, पण तसे न झाल्यास तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. TTE ला काही शंका असल्यास, तो तुमच्याकडून आयडी प्रूफ मागू शकतो. आयडी आणि तिकिटाचे नाव जुळत नसल्यास तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. ही सीट तुम्हाला खूप महागात पडू शकते. कारण तुम्ही या सीटसाठी ब्रोकरला दोन ते तीन पट जास्त पैसे दिले आहेत आणि बनावट तिकीट दाखवल्यानंतर TTE तुमच्याकडून दंड वसूल करेल. यानंतर तुम्हाला नवीन तिकीट काढावे लागेल, तेही वेटिंगमध्ये. म्हणजे सीट गमावली जाईल आणि बरेच पैसेही खर्च होतील. Railway ticket brokers

 

आम्ही तुम्हाला सांगतो की कन्फर्म तिकीट देण्यासाठी, दलाल 400 ते 2000 रुपयांची तिकिटे देतात. त्यामुळे दलालांमार्फत तिकीट बुक करण्याऐवजी थेट तिकीट काउंटरवरून बुक करा. तिकिटाची प्रतीक्षा असली तरी किमान या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आणि प्रवासही सुखकर होईल.

Stone age implements at Chandrapur : चंद्रपुरात 25 हजार वर्षांपूर्वीच्या वस्तीचे पुरावे

0
Chandrapur district

Stone age implements at Chandrapur
कोरपणा तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी असलेल्या भोयेगाव जवळ शेती आणि जंगल परिसरात २५,००० वर्षादरम्यानच्या मध्यपाषांन ( Mesolithic ) युगातील आदिमानवांची अवजारे येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनि नुकतीच शोधली आहेत.

राजकीय बातमी – मोफत रुग्णवाहिका सेवेची शिवसेनेने केली सुरुवात

चंदपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी अवजारे मिळाली असली तरी ह्या परिसरात प्रथमच अश्या प्रकारची मध्याश्मयुगीन अवजारे मिळाली आहेत अशी माहिती त्यांनी नुकतेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
भोयेगाव येथे आढळलेली ही अवजारे आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनविलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर, अगेट,क्वार्ट्झ ह्या खडकांचा समावेश आहे. Stone age implements at Chandrapur

बातमी अवश्य वाचा : चंद्रपूरच्या विद्यार्थिनींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विदर्भ आणि विशेषता चंद्रपूर जिल्हा हा पाषांनयुगात विशेषता हिमयुगात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश होता हे अनेक ठिकाणी आढळलेल्या अवजारावरून लक्षात येते. अश्मयुगात मानव नदीकिनारी राहत असे. भोयेगाव परिसरात नदीकिनारी आढळणारे खडक हे १५० कोटी वर्षाच्या आर्कीयन काळातील असून ते रुपान्तरीत प्रकारात मोडतात. Stone age implements at Chandrapur

 

हे खडक ह्या परिसरात हिमयुगात वाहून आलेले,गाल मिश्रित अल्लूवियम, असून त्यात लहान गोल खडक आढळतात. हे खडक ४०००० ते २५००० वर्षादरम्यान वाहात आलेले आहेत ह्यात क्वार्टझाईट, अगेट, क्वार्ट्झ, जास्पर हे खडक अतिशय टणक आणि मजबूत असून अश्म अवजारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

 

म्हणूनच अश्मयुगातील लोकांना क्वार्टझाईट मँन असे म्हटल्या गेले. भोयेगाव जवळील अवजारात पूर्व पाषाण युगात वापरात असलेली खूप मोठ्या आकाराचचे अवजारे नाहीत तर लहान आकाराची हात कुर्हाड,आणि ब्लेड्स जास्त प्रमाणात आढळतात. Stone age implements at Chandrapur

 

ह्या पूर्वी प्रा सुरेश चोपणे ह्यांनी चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीकिनारी हडस्ती येथे २००७ मध्ये, चंद्रपूर जवळ झरपट नदीकिनारी (पापामिया) येथे १९९७ मध्ये तसेच इरई नदीजवळ दाताळा येथे 2011 मध्ये ,पोभुर्णा जवळ वैनगंगा नदीकिनारी २००८ मध्ये अशी १५ ठिकाणी त्यांनी अश्मयुगीन अवजारे शोधली आहेत. २ लाख ते ५ हजार वर्षे कालखंडात अश्म युगाचे पुराश्म युग,मध्याश्म युग आणि नवाश्म युग असे प्रामुख्याने ३ भाग पाडण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यात तीनही कालखंडात मानव वास्तव्यास होता.

 

प्राचीन मानव हा भटकंती करीत असला तरी तो हा बारमाही नदी किंवा नाल्याच्या जवळ काही काळ राहत असे. ह्या परिसरात गुहा नसल्याने ते झाडाच्या आसऱ्याने उघड्यावर जीवन जगात असे.`अवजारे बनविणे आणि अन्नाच्या शोधात भटकणे असा त्यांचा दिनक्रम असे..ज्या ठिकाणी अवजारे बनविण्यासाठी योग्य खडक असेल आणि अन्न उपलब्ध असेल तेथे काही वर्षे राहणे आणि पुढे योग्य ठिकाणी जाणे असे त्यांचे जीवन होते. खर तर बहुजन समाज वंशज- आज जिल्ह्यात जो आदिवासी आणि बहुजन समाज आहे ते अश्मयुगीन मानवांचेच वंशज आहेत. Stone age implements at Chandrapur

 

आदिमानवामध्ये सुधा वांशिक विभिन्नता होती हे त्यांच्या आजच्या चेहरेपटीवरून लक्षात येते, पुढे वांशिक सरमिसळ झाली आणि मानव विविध जातीत विभागलेला आजचा बहुजन समाज निर्माण झाला. पुढे नवाश्म युगात आपण शेती करायला शिकलो आणि गावे करून स्थाईक झालो.

Ballarpur Assembly : बल्लारपूर विधानसभेतील नागरिकांसाठी शिवसेनेची मोफत सेवा

0
Udhav thackeray shivsena

Ballarpur Assembly शिवसेना प्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर व मुल तालुक्यातील जनतेच्या सेवार्थ नागपूर येथे शिवसेनेच्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला.

ही बातमी अवश्य वाचा : चंद्रपुरातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश

रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण केले. यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. ते म्हणाले की आज रुग्णवाहिका बघितल्यानंतर आम्हाला जुना काळ आठवला, शिवसैनिकाची ओळख ही कसलंही संकट येवो, झोकून काम करुन नागरिकांना मदत करणं ही आहे, असं म्हणत शिवसैनिकांचं मनोबल उंचावण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. Ballarpur Assembly

चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या सामाजिक,पक्ष संघटनेच्या कामाबद्दल उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं, काम करताना शिवसैनिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. Ballarpur Assembly

 

रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम, उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, शलिक फाले, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत साहरे,चंद्रपूर प्रमोद पाटील,तालुका प्रमुख आशिष कावटवार,प्रकाश पाठक, प्रशांत गड्डूवार,विकास विरूटकर,सूरज माडूरवार आदींची उपस्थिती होती.

राजकीय बातमी : 2 नगरसेवकांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

सदर रुग्णवाहिका 24 एप्रिल शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मूल व बल्लारपूर तालुक्यासाठी नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे, ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहे.

Hindu Muslim unity : चंद्रपुरातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

0
Chandrapur unity

Hindu Muslim unity हिंदू मुस्लिम ऐकतेची अनेक उदाहरणे आजवर चंद्रपूर जिल्हाने दिली आहे. असेच एक आदर्श उदाहण पून्हा एकदा दिसुन आले असून आमदार किशोर जोरगेवार यांनी फोन करताच जामा मस्जिद पब्लिक ट्रस्ट चा दादमहल येथील शेरेतुल इस्लाम मदरसा येथे महाकाली यात्रेकरूंना आश्रय दिला आहे.      

ही बातमी अवश्य वाचा – शिक्षणाचा मोफत अधिकार कायद्याचा बट्ट्याबोळ

  चंद्रपुरातील महाकाली यात्रा शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. त्यामुळे राज्य व राज्याबाहेरील लाखो भाविक माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात दाखल झाले आहे. या भाविकांच्या राहण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांचे मित्र डेकोरेशन व्यावसायिक अब्दुल कादर यांच्या वतीने कोहिनूर तलाव येथे पेंडाल  टाकण्यात आले होते. मात्र काल रात्रो झालेल्या वादळी वा-यामुळे पेंडॉल कोसळला. त्यामुळे शेकडो यात्रेकरुंसमोर निवा-याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. Hindu Muslim unity

राजकीय बातमी – चंद्रपूर शिवसेना ठाकरे गटात 2 नगरसेवकांचा प्रवेश

ही बाब आमदार किशोर जोरगेवार यांच्या लक्षात येताच त्यांनी अब्दुल कादर यांच्या सहकार्याने याच परिसरात असलेल्या जामा मस्जिद पब्लिक ट्रस्ट च्या पदाधिकार्यांशी दुरध्वनी वरुन संपर्क साधत शेरेतुल इस्लाम मदरसा येथे यात्रेकरुंना आश्रय देण्याची विनंती केली. मदरसा कमेटीनेही यावर तात्कार होकार देत मदरसेची दारे यात्रेकरुंसाठी खुली केली. Hindu Muslim unity

 

त्यामुळे माता महाकालीच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांच्या येथे निवा-याची सोय झाली आहे. मदरसा कमेटी सदर भाविकांना सोयी सुविधा पुरवत असून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देशाला देत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही जामा मस्जिद पब्लिक ट्रस्ट ने घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आहे. Hindu Muslim unity

 

सोबतच मंदिर परिसरातील मंगल कार्यालये आणि सभागृह यात्रेकरुंसाठी मोकळे करुन तेथे यात्रेकरुंच्या निवासाची सोय करण्याच्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना केल्या आहे. Hindu Muslim unity

 

यापूर्वी चंद्रपुरात आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी किदवाई हायस्कूल खुली करण्याच्या विनंतीचा किदवाई कमेटीच्या वतीने सन्मान करत पूरग्रस्तांसाठी शाळा खुली केली होती. मुस्लीम समाज नेहमी संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करतो असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. 

Letter from student to CM : तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक आम्हाला आवडले नाही

0
Bhushan phuse

Letter from student to CM चंद्रपूर –  महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि अति मागास असलेल्या जीवती तालुक्यातील एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची चर्चा सध्या राज्यभर झाली होती. तुम्ही दिलेले पाठय़पुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार पुस्तके शोधाव लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तकच छान होते. कारण सगळे गणित एका पुस्तकात, सगळे इंग्रजी एका पुस्तकात, सगळे विज्ञान एका पुस्तकात होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तक वाचायला मजा यायची,’ असे तिने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

राजकीय बातमी अवश्य वाचा – 2 नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन

सोबतच अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचे काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. विद्यार्थिनीने लिहिलेले हे पत्र समाजमाध्यमात वायरल झाले होते.या मुलीचा सत्कार समाजसेवक भूषण फुसे यांनी केला. Letter from student to CM

 

शैक्षणिक साहित्य त्यांनी भेट दिलेत.राजकारणात आपल्या कर्तुत्वाने फुसे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. गरजवंतासाठी ते नेहमी धावून जातात. आंदोलनाच्या माध्यमातून जिवती तालुक्यातील अनेक समस्या त्यांनी सोडविल्या आहेत. थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न करणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थिनी दाखवलेल्या हिमतीचे फुसे यांनी कौतुक केले.

 

महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर जिवती तालुका वसलेला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या हा तालुका आजही मागासलेला आहे. येथील अनेक गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कायमचेच या तालुकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. मागास असलेल्या या तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीची चर्चा सध्या राज्यभर झाली होती. Letter from student to CM

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती निमित्याने 5 हजार भक्तांना महाप्रसादचे वाटप

0
Mul taluka

गुरू गुरनुले

Hanuman Jayanti 2024 मुल- मुल बसस्थानक येथे श्री. रामभक्त हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जि.प. अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी आपल्या मातोश्री कमलादेवी चंदनसिंह रावत यांचे स्मृतीप्रित्यर्थ बस स्थानकावर अनेक वर्षापूर्वी हनुमान मंदिराची स्थापना केली.

 

तेव्हा पासूनच दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटामाटात साजरा केल्या जात असून भाविकांचे एक जागृत श्रद्धास्थान बनले आहे. Hanuman Jayanti 2024

Maha prasad Hanuman
महाप्रसाद चा लाभ घेताना भक्त

मुल बसस्थानकावर मुल, सिंदेवाही, पोभूर्णा, सावली, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी, चामोर्शी, गोंडपीपरी जाणारे येणारे हजारो भाविक श्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेत आहेत. आज हनुमान जयंती निमित्त सकाळी ७.०० वाजता मंदिर समिती प्रमुख रुपलसिंह रावत यांचे शुभ हस्ते व संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत मिश्रा महाराज यांचे मंत्रोपचारने मूर्ती पूजन महा अभिषेक करण्यात आले. सकाळी ८ वाजता दहेगाव मानकापूर येथील किशोर पेंदाम व त्यांचे मंडळ आकाशवाणी पुरस्कृत प्रसिद्ध भजन मंडळ यांच्या भक्त संगीताचा व काल्याचा कार्यक्रम करण्यात आला. Hanuman Jayanti 2024

 

सकाळ पासूनच श्री.रामभक्त हनुमान यांच्या दर्शनासाठी मुल शहरातील शेकडो भक्तजन व येणारे जाणारे हजारो प्रवाशी यांनीही हनुमानाचे दर्शन घेतले. दुपारी ११.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

 

महाप्रसादाचे दाते संतोष सिंह रावत यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप हाती घेतले त्यांच्या हाताला हातभार लावण्याचे सहकार्य, रूपल रावत, मोना रावत ,दीपक रावत, सभापती राकेश रत्नावार , प्रतीक मुरकुटे, नंदू कागदेलवार , कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, चतुर मोहुरले, प्रवीण चेपूरवार, चित्तरंजन वाढई, राजू चीलके, नवाब पठान संचालक घनश्याम येनुरकर, मंदिराचे पुजारी महाराज केशव गुज्जनवार, समितीचे लोमेश नागपुरे, सुनील मंगर, किशोर गुज्जनवार, छोटू रावत, संजय टिकले, सुमितसिंह बिष्ट, राजू गावतूरे, तेजस महाडोळे, अंकुश ध्यांनबोइंवार, चेतन कावळे, कमलेश रामटेके, अजय झाडे, सोमा नागपुरे, पंकज लाडवे, निखिल पांडव, यांचेसह हनुमान मंदिर समितीचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते यांनीही ५००० हजार भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात सहकार्य केले. Hanuman Jayanti 2024

 

हनुमान जयंती उत्सव दिना निमित्त आलेल्या समस्त भाविकांना व जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना महाप्रसादाचे वाटप केल्याने आयोजकांप्रती भक्तजनानी आभार व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!