Tehsildar caught taking bribe : चंद्रपूर जिल्हा गौण खनिज संपत्तीने संपन्न जिल्हा आहे त्यामुळे अवैध उत्खनन याठिकाणी मोठ्या प्रमाणात होते, मात्र प्रशासन त्यावर कारवाई न करता डोळेझाक करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर येथे याउलट एक प्रकरण उघडकीस आले असून त्यामध्ये गौण खनिज प्रकरणी कारवाई न करणे बाबत तहसीलदार यांनी २ लाख २० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी १ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून तलाठी हे रजेवर असल्याने त्यांचा शोध सुरु आहे.
चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा उच्चांक
बिल्डिंग मटेरियल सप्लाय चे काम करणारे एक व्यक्ती आपल्या शेतातील माती\मुरूम काढून लेव्हलिंग चे काम करीत होते त्यावेळी कवडजई साजाचे तलाठी सचिन रघुनाथ पुळके व तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांनी मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने २ ट्रॅक्टर व १ जेसीबी जप्त करण्याची तयारी दर्शविली त्या व्यक्ती/तक्रारदार यांचेवर कसलीही कारवाई न करण्याकरिता २ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. Bribery in revenue department
तक्रारदार यांनी त्याचदिवशी म्हणजे २३ मार्च ला तहसीलदार व तलाठी यांना १ लाख १९ हजार ९०० रुपये दिले, उर्वरित १ लाख रुपयांसाठी तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदाराच्या मागे तगादा लावला असता त्यांच्या त्रासाला कंटाळून २६ मार्चला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. Maharashtra government officer bribe
तडजोडीतील १ लाख रुपये स्विकारण्याची तयारी बल्लारपूर चे तहसिलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुळके यांनी मान्य केल्याच्या कारणावरून लाच प्रकरणात तहसिलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुळके यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात अडकवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, संजय पुरंदरे, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे,अमोल सिडाम,प्रदीप ताडाम,सतीश सिडाम यांनी केली
Leave a Comment