PM Internship Scheme । चंद्रपुरातील डिग्री-डिप्लोमा तरुणांसाठी 23 जागा, आजच नोंदणी करा

April 22, 2026 by Prakash Hande

PM Internship Scheme : चंद्रपूर : पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अभियान अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना राबविण्यात येत असून नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेच्या नोंदणीसाठी pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत देशातील टॉप 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्हासाठी डिप्लोमा आणि डिग्री उमेदवाराकरीता अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीच्या 20 जागा व श्रीराम जनरल इन्सुरंस कंपनी लिमीटेड या कंपनीच्या 3 जागा उपलब्ध आहेत. (२७ बालकांसाठी देवदूत ठरले आमदार जोरगेवार)

 

कॉपोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक इंटर्नसाठी प्रति महिना 9 हजार रूपये देण्यात येणार आहे व इंटर्नशिप चा कालावधी 6 किंवा 9 महिने आहे. भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत या प्रशिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष असून पूर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले बेरोजगार तरुणांसाठी ही संधी आहे.

 

तरी चंद्रपूर जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.

Leave a Comment

+