Son Attacks Father । "आईला का मारता?" एवढं विचारलं अन वडिलांच्या छातीत खुपसली सब्बल

April 22, 2026 by Prakash Hande

Son Attacks Father : वरोरा - तुम्ही माझ्या आईला रोज विनाकारण झगडा भांडण करून त्रास का देता असे म्हणत मुलाने वडिलांच्या छातीत थेट सब्बल खुपसली. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. शेगाव पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. (मित्रांसोबत वाद, चाकूने हल्ला करीत हत्या)

 

वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकूम मध्ये ७० वर्षीय मारोती दडमल हे कुटुंबासह राहत असून शेतमजुरीचे काम करतात, दडमल यांना ४ मुले असून २ मुलांचे लग्न झाले आहे, ते गावात वेगळ्या घरी राहतात. त्यामुळे दडमल हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. मारोती दडमल हे नेहमी पत्नी ६४ वर्षीय ठकाबाई दडमल यांच्यासोबत विनाकारण वाद करीत शिवीगाळी करून त्रास देत होते.

 

मारोती दडमल यांचे २ मुले त्यांना झगडा करू नका असे नेहमी सांगत होते, पण ते मुलांचे काही ऐकायला तयार नव्हते. पत्नीने पतीला जेवायला न दिल्याने ते मागील ७ महिन्यापासून मोठा मुलगा विठोबा यांच्याजवळ जेवण करीत होते व रात्री लहान मुलाकडे रहायला जात होते. 

 

२० एप्रिलला मुलगा २४ वर्षीय संदीप दडमल हा गाडीचे फायनान्सचे पैसे भरण्याकरिता वरोरा शहरात गेला होता. सायंकाळी ६ वाजता संदीप घरी परतला त्यावेळी वडील मारोती हे घराबाहेर बसले होते. त्यांना बघून मुलगा संदीप याने तुम्ही आईला विनाकारण शिवीगाळी करीत त्रास का देता असे म्हणत घराच्या दरवाज्या मागे ठेवलेली सब्बल घेत वडील मारोती दडमल यांच्या छातीत खुपसली. Local Crime Updates 

या हल्ल्याने वडील खाली कोसळले, छातीतून रक्तस्त्राव सुरु झाला, आई ठकाबाई ने मुलाला ढकलत दुपट्टा पतीच्या छातीवर ठेवला, यावेळी पुतण्या श्रीकृष्ण दडमल व मुलगा संदीप यांनी वडिलाला दुचाकीवर बसवीत रुग्णालयात नेले मात्र प्रकृती खराब असल्याने डॉक्टरांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. २१ एप्रिल रोजी आई ठकाबाई ने मुलगा संदीप दडमल यांच्या विरोधात शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

Leave a Comment

+