Missing Girls । "माझी मुलगी कुठे आहे?" चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची मालिका सुरुचं

April 22, 2026 by Prakash Hande

Missing Girls Chandrapur : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींची बेपत्ता होण्याची मालिका सुरूच असून आतापर्यंत २० च्या वर अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आल्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाटण, जिवती व माजरी मधील ३ मुली बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (आईला का त्रास देता असे म्हणत मुलाने वडिलांच्या छातीत सबलीने केला प्रहार)

 

१८ एप्रिल रोजी पाटण मधील १७ वर्षीय मुलगी कुटुंबासह रात्री स्लॅपवर झोपले होते, सकाळ होताच अल्पवयीन मुलगी आढळून आली नाही, वडिलाने मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र शेवटी वडिलाने पाटण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळविल्याची तक्रार दिली. 

 

दुसऱ्या घटनेत जिवती तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी घरून बेपत्ता झाली, १९ एप्रिल रोजी पाटण मध्ये आठवडी बाजार असल्याने आई-वडील व मुलगा हे तिघे बाजारात गेले, घरी आल्यावर मुलगी घरी आढळून आली नाही. वडिलाने मुलीचा शेजारी व मित्र - मैत्रिणीकडे शोध घेतला मात्र ती कुठेही मिळाली नाही. शेजारी राहणारा मुलगा सुद्धा घरी नव्हता त्याला संपर्क केला मात्र मोबाईल बंद असल्याने त्याने मुलीला फूस लावून पळविल्याचा संशय वडिलांना आला. याबाबत जिवती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

 

माजरी गावातील १७ वर्षीय मुलगी रात्रीच्या सुमारास घरी आढळून न आल्याने मुलीच्या आईने माजरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १९ एप्रिल ला सकाळी रात्री आई सरकारी नळावर पाणी भरत होती. पाणी भरून झाल्यावर आई घरी आली २ मुले व १ मुलगी घरी झोपून होती मात्र मोठो मुलगी दिसून आली नाही. आईने मुलीचा सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती कुठेही आढळली नाही. याबाबत आईने कामावर असलेल्या पतीला सर्व प्रकार सांगितला.

माजरी पोलीस ठाण्यात कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळविल्याचा संशय व्यक्त करीत तक्रार देण्यात आली. आजच्या आधुनिक युगात समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा परिणाम अल्पवयीन मुलांवर होत आहे. राज्यात समाजमाध्यमामुळे अनेक विपरीत घटना घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याकरिता पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Comment

+