गुपचूप दारू पोहोचवण्याचा प्लॅन फसला! गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीला केली अटक

February 24, 2026 by Prakash Hande

Illegal Alcohol Transport : भद्रावती (जि. चंद्रपूर) – पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमावर पोलिसांनी कारवाई करून ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 23 जानेवारी 2026 रोजी प्राप्त तक्रार व मुखबिराच्या खात्रीशीर माहितीच्या आधारे करण्यात आली. (सततचा त्रास मुलाने दारुड्या वडिलाला संपविले)

 

मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा फाटा परिसरात प्रणय राऊत (वय 31 वर्षे, रा. काटवल (तुकूम)) हा अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरोरा उपविभाग पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी संयुक्तपणे प्रो-रेड (छापा) टाकला.

 

छाप्यात आरोपीकडून एक मोपेड गाडी (किंमत अंदाजे ₹70,000) तसेच प्रत्येकी 90 एमएलच्या 200 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹8,000) असा एकूण ₹78,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्र. 412/26 नुसार कलम 65 (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

अवैध दारूविक्रीवर पोलिसांची करडी नजर

ग्रामीण भागात अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. अशा कारवायांमुळे बेकायदेशीर दारू व्यवसायाला आळा बसण्यास मदत होत असून नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Illegal Alcohol Transport

सदर कारवाई वरोरा उपविभाग पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

+