चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची बदली अहिल्यानगर जिल्ह्यात झाली असून त्यांच्या जागी जालना जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची पोलीस अधीक्षक चंद्रपूर जिल्ह्यात वर्णी लागली आहे. (चंद्रपूर महापौर यांना बरखास्त करा)
भारतीय पोलीस सेवेतील २१ आयपीएस अधिकाऱ्यांची आज बदली करण्यात आली, असा आदेश ३० एप्रिल रोजी गृह विभागातर्फे निघाला आहे. वरोरा उपविभागातील तत्कालीन उपविभागीप पोलीस अधिकारी ज्यांनी वाळू माफियांचे सिंडिकेट उध्वस्त केले होते, असे आयपीएस पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते आयुष नोपानी आता चंद्रपूर जिल्ह्यातील कमान सांभाळणार आहे.
पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने डोकं वर काढलं होत, ती परिस्थिती पुन्हा उदभवणार नाही अशी प्रवृत्ती ठेचण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यापुढे असणार आहे. चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून नोपानी यांनी कार्यभार स्वीकारला आहे.
Leave a Comment