Online Satta Raid : भद्रावती (जि. चंद्रपूर) – पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील ICC Men's T20 World Cup स्पर्धेतील West Indies cricket team विरुद्ध Zimbabwe national cricket team या सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या एका इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील क्रिकेट सट्टेबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (राजुऱ्यात हायस्कुल समोर क्रिकेट सट्टा, गुन्हे शाखेने केली कारवाई)
दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुमठाणा चौक, भद्रावती येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान विलास शंकरराव पारखी (वय 42, रा. खापरी ता. भद्रावती जि. चंद्रपूर) हा आपल्या मोबाईल फोनवर वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावताना आढळून आला.
पोलीसांनी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्र. 413/26 नुसार कलम 12 (A) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा सह कलम 49 BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अंदाजे ₹10,000 किंमतीचा मोबाईल फोन
ऑनलाइन जुगार संदर्भातील स्क्रीनशॉट
एकूण जप्त मालाची किंमत सुमारे ₹10,000 इतकी आहे.
या प्रकरणात आकाश शहू (रा. पंचशील वार्ड, भद्रावती) याचा सहभाग असल्याचा संशय असून तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
टी-२० वर्ल्ड कपसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मोबाईल अॅप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करून बेकायदेशीर व्यवहार केले जात असल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. कमी रकमेपासून सुरुवात करून मोठ्या पैशांच्या व्यवहारात रूपांतर होत असल्याने आर्थिक फसवणूक व गुन्हेगारी वाढण्याची शक्यता निर्माण होते. Online Satta Raid
स्थानिक गुन्हे शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन जुगार किंवा सट्टेबाजीच्या आमिषाला बळी पडू नये. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.
सदर कारवाई उपविभाग वरोरा पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
Leave a Comment