घुग्गुस उपाध्यक्ष निवडणूक: वडेट्टीवारांनी वाचवली काँग्रेस

January 17, 2026 by Prakash Hande

Ghugus Vice President Election : चंद्रपूर ७ जानेवारी - घुग्गुस नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता झालेल्या निवडणुकीवरील संकट आमदार वडेट्टीवार यांच्यामुळे टळलं, उपाध्यक्ष पदावरून घुग्गुस कांग्रेस पक्षातील नगरसेवकांचे दोन गट पडले होते. राष्ट्रवादी कांग्रेस मधून निवडून आलेले नगरसेवक रविश सिंग यांनी मोठी खेळी खेळत उपाध्यक्ष पदावर दावा ठोकला, इतकंच नव्हे तर कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा रविश सिंग यांना समर्थन द्यावे यासाठी समर्थता दाखवली. (घुग्गुस कांग्रेस अध्यक्ष रेड्डी यांनी जारी केला व्हीप)

नवनिर्मित घुग्गुस नगरपरिषद निवडणुकीत कांग्रेस पक्षाने बाजी मारत ११ नगरसेवक सह नगराध्यक्ष निवडून आले, यासह २ अपक्षांनी कांग्रेसला जाहीर पाठिंबा दिला, मात्र उपाध्यक्ष पदासाठी मोठा ट्विस्ट निर्माण झालं, पक्षातील नगरसेवकाला उपाध्यक्ष पद मिळावं अशी मागणी कांग्रेसकडून होती, मात्र काही नगरसेवकांनी दुसरा गट स्थापन करीत राष्ट्रवादी कांग्रेसच्या नगरसेवकाचे नाव पुढे केले.

उपाध्यक्ष पदावरून पक्षात बंडखोरी न व्हावी यासाठी कांग्रेस अध्यक्ष व नगरसेवक राजू रेड्डी यांनी कांग्रेस नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला, खासदाराचे समर्थन न मिळाल्याने व पक्षावरील संकट गडद होत असताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी धुरा सांभाळत, उपाध्यक्ष पदी राजू रेड्डी यांचे नाव सुचवीत बंडखोरांना थंड केले. कांग्रेस ला नागरिकांनी भरघोस मतदान केले असे असताना दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकाला पाठिंबा देत मतदारांचा अपमान होता कामा नये अशी भूमिका राजू रेड्डी यांनी घेतली होती. Ghugus Vice President Election

रेड्डी यांना बहुमत

उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजू रेड्डी यांना एकूण १६ मते तर भाजपचे गणेश पिंपळकर यांना ७ मते मिळाली, उपाध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवकांची निवडही यावेळी करण्यात आली, कांग्रेस तर्फे तौफिक शेख व भाजपतर्फे निरीक्षण तांड्रा यांची स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लागली.

आमदार वडेट्टीवार यांनी बंडोबा ला शांत केले त्यामुळे उपाध्यक्ष पदाची निवडणूक सुरळीत पार पडत रेड्डी यांच्या बाजूला बहुमत मिळाले आणि ते उपाध्यक्ष पदी विराजमान झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कांग्रेसचे रविश सिंग सह दोन नगरसेवकांनी रेड्डी यांना उपाध्यक्ष पदाकरिता पाठिंबा दिला. रेड्डी यांनी घुग्गुस नगर परिषदेतील हद्दीत असलेल्या समस्या तात्काळ सोडविण्याचे काम आम्ही करू असे आश्वासित केले.

कांग्रेसचा अंतर्गत वाद

चंद्रपूर कांग्रेस पक्षात सुरु असलेला अंतर्गत कलह हा काही नवीन नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात धानोरकर-वडेट्टीवार वाद हा जुना आहे, दोन्ही नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत कार्यकर्त्यांचा हिरमोड होत असल्याने आगामी काळात कांग्रेसचे भवितव्य काय राहणार हे येणार काळचं सांगेल. वडेट्टीवार जर आजच्या निवडणूक प्रकियेत सहभागी झाले नसते तर घुग्गुस नगरपरिषद उपाध्यक्ष पद निवडणुकीचा निकाल काही औरच असता. विजय वडेट्टीवार हे घुग्गुस कांग्रेससाठी संकटमोचक ठरले.

Leave a Comment

+