Chandrapur rare deer found dead । चंद्रपूरच्या गोविंदपूर शेतात मृत अवस्थेत सापडला दुर्लभ चौशिंगा

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur rare deer found dead

Chandrapur rare deer found dead : गोविंदपूर येथील सापेपारती परिसरात एका शेतात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या चौशिंगा प्रजातीचा नर प्राणी मृत अवस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही माहिती स्वाब संस्थेचे नितीन भेंडाळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तळोधी वन परिक्षेत्राला याबाबत कळवले.

कामगार वाचवायचे असतील तर ...मनसेचे अमन अंधेवार यांची काय आहे मागणी बघा?

बिबट्याने हल्ला केल्याचा संशय

वन विभागाने घटनास्थळी धाव घेत मोक्का पंचनामा केला. सदर चौशिंगा नर प्रजातीचा असून, वय अंदाजे सहा वर्षे आहे. त्याच्या मानेवरील दात आणि नखांचे ओरखडे पाहता, बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तो पळत असताना झाडावर आदळून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. Chandrapur wildlife incident deer death

ही घटना तळोधी वनपरिक्षेत्रातील गोविंदपूर क्षेत्रात बागडे यांच्या शेतात घडली. घटनास्थळीच मोक्का पंचनामा करण्यात आला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे शवविच्छेदन करून प्राण्याचे शव त्या परिसरातच पुरण्यात आले.

या वेळी तळोदीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, गोविंदपूरचे क्षेत्र सहाय्यक आर. एस. गायकवाड, वनरक्षक श्रीरामे आणि चुधरी, तसेच स्वाब संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे आणि वनमजूर उपस्थित होते.

Leave a Comment

+