Chandrapur Haldi Fight । हळदीत नाचताना पाय पडला, चप्पल तुटल्याने धारदार शस्त्र निघाले

April 27, 2026 by Prakash Hande

Chandrapur Haldi Fight : चंद्रपूर - डीजेच्या तालावर दारू पिऊन नाचत असताना पायावर पाय पडला आणि एकाची चप्पल तुटली, यवादातून मारहाण आणि नंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. भाईगिरीची हि घटना बाबुपेठ भागातील श्रीनगरमध्ये घडली. चंद्रपूर शहरात सध्या धारदार शस्त्र सोबत ठेवण्याचे फॅड सुरु आहे, पोलिसांचा धाक या गुन्हेगारी वृत्तीवर नसल्याने अश्या घटना घडत आहे. (किरकोळ वादातून चंद्रपुरात दुकान फोडले)

 

बाबुपेठ व लालपेठ जवळील श्रीनगर भागात हि घटना घडली, प्रबुद्ध २५ एप्रिल ला रात्री १० वाजता २७ वर्षीय विजय पगाडे हे प्रबुद्ध अलोणे यांच्या घरी बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम असल्याने गेले होते. जेवण झाल्यानंतर डीजेच्या तालावर पाहुणे व तरुण मंडळी थिरकले.

यावेळी नाचत असताना आदित्य पेटकर या मुलाचा पाय विजय च्या पायावर पडल्याने त्याची चप्पल तुटली, तुझा पाय माझ्या पायावर पडल्याने चप्पल तुटली, असे विजय आदित्य ला म्हणाला तर मी काय करू असे उत्तर आले, दारूची नशा व डीजेच्या तालावर ठेका सुरु असताना विजय ने आदित्यची माफी मागितली, गर्दीत असे होणे साहजिकच होते. 

 

मात्र आदित्य ने विजय सोबत वाद सुरु केला, वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, दोघांनी एकमेकांना चोपले, आदित्यचा मित्र हि या वादात उतरला आणि विजयला मारहाण करू लागला, इतक्यात आदित्य ने आपल्या जवळील धारदार शस्त्राने विजय वर वार करण्याचा प्रयत्न केला असता यावेळी विजयचा मित्र आकाश अउंदेकर मध्ये आला, त्या शस्त्राचा वार आकाश वर झाला, आकाश जखमी झाला, रक्तस्त्राव होत असल्याने आकाश कोसळला. हे बघून आदित्य पेटकर व त्याचा मित्र पळून गेले.

 

आकाश ला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, याबाबत विजय पगाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी आरोपी आदित्य पेटकर राहणार बाबुपेठ हाफ पुतळा व त्याच्या मित्रावर कलम ११८ (१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला.  Bhaigiri Chandrapur

चंद्रपूर शहरात दररोज नवीन भाई जन्माला येत आहे, १४ एप्रिल च्या दिवशी दोन वाद झाले, त्यानंतर नुकतीच अभय टॉकीज चौकात काही युवकांनी नाश्ता सेंटरची तोडफोड केली, आणि आता घरघुती कार्यक्रमात शस्त्र निघू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या गुन्हेगारी प्रवुत्तीला आपल्या भाषेत कधी उत्तर देणार? यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. 

Leave a Comment

+