KVRR Company Overload : चंद्रपूर - दुर्गापूर क्षेत्रातील WCL द्वारे over burden चे काम KVRR कंपनीला देण्यात आले मात्र कंपनीने अनेक नियम पायदळी तुडविल्याने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (चंद्रपूर मनपात गोलमाल सुरु, गरज नसताना कोट्यवधी रुपयांचा खर्च)
KVRR कंपनीद्वारे एका ठिकाणाहून दुसरीकडे माती नेण्याचे काम आहे, पण ओव्हरलोड वाहतूक व प्रदूषणामुळे परिसरातील वरवट, चोरगाव, आणि सिनाला तुकूम या गावातील शेतकऱ्यांची शेती यामुळे बाधित होत आहे.
KVRR कंपनीच्या वाहनांची क्षमता हि ४० ते ५० टन आहे मात्र आपल्या आर्थिक फायद्यासाठी वाहनातून तब्बल ७० ते ८० टन मातीची ओव्हरलोड वाहतूक करण्यात येत असल्याने वाहतूक कायद्याचे उल्लंघन होत आहे, त्यामुळे कंपनीवर ओव्हरलोड वाहतुक दंडात्मक कारवाई व वाहन जप्ती करण्यात यावी असे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
वाहतुकीमुळे होत असलेले प्रदूषण बघता KVRR कंपनीची चौकशी करण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर अधिकारी यादव यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने यासंदर्भात कारवाई केली नाहीतर भविष्यात कंपनीविरुद्ध आंदोन उभारले जाणार असा इशारा विक्रांत सहारे यांनी दिला आहे.
Leave a Comment