chandrapur zilla parishad draft notification : चंद्रपूर, दि. १५ : चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग बाबतीत निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे. त्यानुसार जि.प. निवडणूक विभाग 56 व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना 112 करण्यात आली आहे. ward wise zilla parishad seats chandrapur district
सांडपाणी पाईपलाईन नंतर रस्त्यांची झपाट्याने दुरुस्ती
वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे प्रारूप परिशिष्ट 5 (अ) व 5 (ब) मधील अधिसूचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात, 14 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयील सूचना फलक / संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना 21 जुलै 2025 पर्यंत जिल्हाधिकारी /संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. zilla parishad election ward structure chandrapur
सन 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या 14 लक्ष 23 हजार 349 आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लक्ष 98 हजार 28 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3 लक्ष 18 हजार 373 अशी आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग 56 व पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रभाग रचना 112 निश्चित करण्यात आली आहे.
यात चिमूर (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या - 10), नागभीड (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), ब्रम्हपुरी (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या - 10), सिंदेवाही (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), भद्रावती (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), वरोरा (जि.प. सदस्य संख्या -5, पंचायत समिती सदस्य संख्या - 10), चंद्रपूर (जि.प. सदस्य संख्या -5,
पंचायत समिती सदस्य संख्या - 10), मूल (जि.प. सदस्य संख्या -3, पंचायत समिती सदस्य संख्या - 6), सावली (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), पोंभुर्णा (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या - 4), गोंडपिपरी (जि.प. सदस्य संख्या -3, पंचायत समिती सदस्य संख्या - 6), बल्लारपूर (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या - 4), कोरपना (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8), जिवती (जि.प. सदस्य संख्या -2, पंचायत समिती सदस्य संख्या - 4) आणि राजूरा (जि.प. सदस्य संख्या -4, पंचायत समिती सदस्य संख्या - 8) अशी आहे.
Leave a Comment