Gold Chain Snatching : भद्रावती - शहरातील झाडे प्लॉट ठाकरे यांच्या दवाखान्याजवळ एकट्या घरी राहणाऱ्या जेष्ठ नागरिक महिलेच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत महिलेच्या गळ्यातील १४ ग्राम सोन्याचा गोप हिसकावीत पळ काढला, याबाबत भद्रावती पोलीस ठाण्यात २४ एप्रिल रोजी महिलेचा मुलगा अशोक झाडे यांनी तक्रार दिली. (IPL सट्टा लावताना अहेरीच्या युवकाला अटक)
५९ वर्षीय अशोक झाडे हे किल्ला वॉर्डात राहतात त्यांची आई जुन्या घरी राहत असल्याने मुलगा अधूनमधून आईला भेटायला जात असतो, २४ एप्रिलला पहाटे ३.३० वाजता अज्ञात व्यक्तीने ८६ वर्षीय शारदा झाडे यांच्या घरी प्रवेश करीत महिला झोपून असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोप कैचीने कापत होता.
त्यावेळी शारदा झाडे या खळबळून जागे झाल्या व चोरासोबत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने गोप कैचीने कापत पळ काढला, शारदा झाडे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी जागे झाले, शेजाऱ्यांनी मुलगा अशोक ला याबाबत माहिती दिली. अशोक घरी आला असता आईने घडलेला प्रकार सांगितला.
१४ ग्राम सोन्याच्या गोप किंमत ५६ हजार ५२६ रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबविल्याची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली, पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३(५), ३०९ (४) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला.
Leave a Comment