Chandrapur Extortion Case : चंद्रपूर - चंद्रपुरात ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्याला व्हाट्सअप कॉल द्वारे धमकी देत २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली, २४ एप्रिल रोजी त्या ठेकेदाराने व्हाट्सअप कॉल करणाऱ्यावर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. (मध्यरात्री गुन्हे शाखेने पकडला ८ किलो गांजा)
सिटीपीएस मध्ये टर्बाईन मेन्टनन्स व ट्रांसपोर्टींगचे काम करणारे ५१ वर्षीय मोहम्मद सॉईल मोहम्मद इस्माईल राहणार आंबेकर लेआऊट मेमन जमात खाना, घुटकाला वॉर्ड चंद्रपूर यांना १९ एप्रिल रोजी व्हाट्सएप्प कॉल आला, मी राकेश गाडेकर नागपुरातून बोलतो असे सांगितले. तुझ्या नावाचे काम आले आहे, जर तुला सुरक्षित रहायचे असेल तर मला २० लाख रुपये द्यावे लागतील.
सोईल शेख म्हणाले मी तुला कशाचे पैसे देऊ, माझी सुपारी तुला कुणी दिली असे विचारल्यावर गाडेकर म्हणाला कि जर तू मला पैसे दिलेस तर चंद्रपुरात तुला कुणीही त्रास देऊ शकणार नाही, मला कुणी सुपारी दिली ते मी सांगू शकत नाही, तू पैसे दे जर दिले तर ज्याने सुपारी दिली त्याला मी टाकतो. तू आता किती पैसे देऊ शकतो हे सांग.
मी आताच नगरसेवकाची निवडणूक लढलो आहे, ज्यामुळे सध्या माझ्याजवळ पैसे नाही, मी कर्जबाजारी झालेलो आहे, मी पैसे देऊ शकत नाही, असे म्हटल्यावर गाडेकर ने तुला जितके पैसे जमते ते सांग असे म्हटले. पुढच्या व्यक्तीची भीती वाटल्यावर शेख यांनी उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत सांगतो असे म्हणत वेळ मारला. व्हाट्सअप वर झालेले संभाषण शेख यांनी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले.
या बाबत सोईल शेख यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन गाठत राकेश गाडेकर विरोधात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी याप्रकरणी कलम ३०८(३) व ३०८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
Leave a Comment