Mul Maldhakka Protest : चंद्रपूर - जिल्ह्यातील मूल शहरात ३ वर्षांपूर्वी मालधक्क्याला विरोध करून नागरिकांनी प्रशासनाला स्थानांतरित करण्यास भाग पाडले होते, मात्र आता पुन्हा शहरात मालधक्का सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने मालधक्का हटाव संघर्ष समितीने कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात आज चंद्रपुरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (१ मे पासून सुरु होणार डिजिटल जनगणना)
सुरजागड मधील आयर्न खनिजाची वाहतूक करण्यासाठी वर्ष २०२३ मध्ये चांदाफोर्ट-गोंदिया या रेल्वेमार्गावर मालधक्का प्रस्तावित करण्यात आला होता, त्यावेळी शहरातील नागरिकांनी एकत्र येत मालधक्का हटाव संघर्ष समिती स्थापन करीत आंदोलन करीत मालधक्का सुरु होऊ दिला नाही, नागरिकांचा विरोध बघता प्रशासनाने मालधक्का हा केळझर गावात सुरु केला. ३ वर्षानंतर माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मूल शहरात मालधक्का सुरु करावा असे निवेदन दिले, मालधक्का सुरु झाला तर मूल तालुक्यातील मानव-वन्यजीव संघर्ष थांबणार असे अजब कारण सांगण्यात आले. मालधक्का मुळे शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असे भासवीत जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शालेय विद्यार्थ्यांचे स्वाक्षरी पत्र मालधक्का समर्थनार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले.
याबाबत वृत्तपत्रात बातमी प्रकाशित होताच मालधक्का हटाव संघर्ष समितीने माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या या कृत्याचा निषेध केला, पत्रकार परिषदेत मूल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष एकता समर्थ म्हणाल्या कि शहरात मालधक्का न व्हावा याकरिता आम्ही सर्वानी नगरपरिषदेत एकमताने ठराव मंजूर केला आहे. मालधक्का सुरु झाल्यास शहरातील प्रदूषणात मोठी वाढ होणार, सकाळी रेल्वे स्टेशनजवळील मैदानात जाणारे नागरिक, पोलीस भरतीची तैयारी करणारे विद्यार्थी जाणार कुठे, शहरातील एकमेव मैदानावर मालधक्का आड आयर्न खनिजाचे डम्पिंग यार्ड त्या ठिकाणी तयार करण्याचा डाव प्रशासन व काही मूठभर राजकीय पुढारी करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मूल शहरातील एकही विद्यार्थी या मालधक्क्याच्या समर्थनाथ नाही, व अशी स्वाक्षरी मोहीमही राबवली नाही असेही समर्थ यावेळी म्हणाल्या.
मालधक्का सुरु झाल्यास काय होणार? गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड खाणीतून दररोज १ हजार ट्रकद्वारे खनिजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत, ते खनिज रेल्वे वॅगन द्वारे रायपूर स्थित पोलाद कारखान्यात पाठविण्यात येणार, आधीच या वाहतुकीमुळे गोंडपिपरी तालुक्यातील अनेक नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे, गोंडपिपरी मध्ये अनेक नागरिकांनी खनिज वाहतुकीला विरोध केला मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. आता तसाच प्रकार मूल शहरात सुरु करण्याचा प्रकार काही राजकीय पुढारी करू पाहत आहे. याउलट मालधक्क्याला विरोध म्हणून ५ हजार विदयार्थ्यांनी मुख्यमंत्री व प्रशासनाला निवेदन दिले होते. मालधक्का हटाव संघर्ष समितीमध्ये मुल शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व उद्योजक नागरिकांसह पत्रकारांचा समावेश आहे. वर्ष २०२३ ला सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्तीने मालधक्का शहरातून केळझर मध्ये स्थलांतरित करण्यात आला होता. आज केळझर गावातील रस्ते संपूर्णतः मोडकळीस आले आहे. गावातील कुणाला रोजगार मिळाला नाही. Maldhakka Pollution Issue
आयोजित पत्रकार परिषदेत विजय सिद्धावार, मुल नगर पालिकेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते अनिल मोगरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. प्रणव बैरागडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल बच्चुवार, प्रा. प्रशांत वासाडे, नगरसेवक विवेक मुत्तलवार, ऍड. अश्विन पालीकर, डॉ. दिनेश वराडे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत गट्टूवार, कैलास चलाख, सुरेश फुलझेले, संदीप मोहबे, श्रीकांत बुक्कावार, भास्कर खोब्रागडे, दिनेश गोयल, महेश गाजुलवार, प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, प्राचार्य नितीन येरोजवार, साई चिमड्यालवार, राहुल येनप्रेडडीवार, संतोष पालांदूरकर, भोजराज गोवर्धन, दुर्वास घोंगडे, कुमुदिनी भोयर, संजय भुसारे, सचिन चिंतावार, जयंत दांडेकर सह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.
Leave a Comment