Criminals Externed News : चंद्रपूर - होळी व धुलिवंदनाचा सण शांततेत पार पडावा यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने तब्बल ६८५ गुन्हेगारी वृत्तीना हद्दपार केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता व सामाजिक सलोखा कायम रहावा याकरिता पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन यांनी आदेश जारी केला आहे. (चंद्रपुरातील ३ वर्षाच्या बाळाची विक्री, पोलिसांची तत्पर कारवाई)
चंद्रपूर जिल्ह्यातील आगामी होळी व धूलिवंदन सणात सामाजिक सलोखा कायम रहावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शांतता भंग करणाऱ्या विघातक प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अनव्ये संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ६८५ इसमांसाठी मनाई आदेश पारित करण्यात आला.\
Leave a Comment