गोंडपिपरीत उभ्या ट्रकला दुचाकीची भीषण धडक, घराचा आधार हरपला

March 09, 2026 by Prakash Hande

Gondpipri Road Accident : गोंडपिपरी (चंद्रपूर) - उभ्या ट्र्कला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना ८ मार्च ला रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. ४० वर्षीय मनोज बाबुराव बुरेवार असे दुचाकी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी ट्र्क चालकावर गुन्हा नोंद केला आहे. (१९ वर्षीय युवकाजवळ पिस्टल व जिवंत काडतुसे आढळली)

 

मृतक मनोज बुरेवार हे गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर मध्ये मिस्त्रींचे काम करतात. ८ मार्चला घर बांधकामाचे काम शोधण्यासाठी ते लहान भाऊ सिकंदर बुरेवार यांच्या घरी जोगापूर ला दुचाकी क्रमांक एमएच ३४ एटी ८५८८ ने गेले होते. भावाच्या घरी जेवण आटोपून रात्री ८ वाजताच्या दरम्यान मनोज धानापूर जाण्यासाठी दुचाकी ने निघाले असता करंजीजवळ बारा चक्का ट्र्क क्रमांक एमएच ३४ बिझेड १२३१ हा रोडच्या डाव्या बाजूला तिरप्या अवस्थेत उभा होता.

 

रात्रीच्या सुमारास मार्गावर गडद अंधार व ट्र्क चालकाने पार्किंग लाईट सुरु न केल्याने उभा ट्र्क ला मनोज बुरेवार यांची दुचाकी धडकली, या अपघातात मनोज बुरेवार यांचा जागीच मृत्यू झाला, मृतकाच्या पत्नीने याबाबत गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये पतीच्या मृत्यूस कारणीभूत ट्र्क चालकावर गुन्हा दाखल केला. नो पार्किंग मध्ये चालकाने ट्र्क उभा करीत त्याचे पार्किंग लाईट्स सुरु न ठेवल्याने ट्र्क मनोज ला दिसला नाही त्यामुळे हा अपघात झाला, याला कारणीभूत ट्र्क चालकावर गुन्हा दाखल करा अशी तक्रार पोलीस स्टेशन गोंडपिपरी मध्ये देण्यात आली.

गोंडपिपरी पोलिसांनी अज्ञात ट्र्क चालकावर कलम १२२, १७७ व १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

 

Leave a Comment

+