चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील अंमली पदार्थाचे हब असलेल्या इंदिरा नगर भागात रामनगर पोलिसांनी धाड मारत १०.१५ ग्राम एमडी पावडर जप्त करीत महिला व युवकाला अटक केली असून या कारवाईत एकूण १ लाख ५६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (बिअर बार च्या आड देहव्यापार, चिमूर पोलिसांची कारवाई)
इंदिरा नगर भागात एमडी पावडर एका घरी अवैधरित्या बाळगून असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकासह मक्का मस्जिद जवळ इंदिरानगर मध्ये राहणारी ३३ वर्षीय महिला अमरीन हनीफ शेख यांच्या घरी धाड मारत झडती घेतली असता महिलेच्या घरातील कपाटात एमडी पावडर आढळून आली, कारवाई दरम्यात त्याठिकाणी उपस्थित असलेल्या २२ वर्षीय युवकाची झडती घेण्यात आली. २२ वर्षीय यशोधन प्रकाश नेल्लुरी या युवकांकडून एमडी पावडर, ९ मोबाईल व वजन करण्याकरिता इलेक्ट्रिक काटा जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण १०.१५ ग्राम एमडी पावडर, ९ मोबाईल सह रोख रक्क्म असा एकूण १ लाख ५६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी महिला अमरीन हनीफ शेख व यशोधन प्रकाश नेल्लुरी यांच्यावर एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरात रयतवारी कॉलरी व इंदिरानगर भाग हा अंमली पदार्थाची विक्री करणारा हब आहे, याठिकाणी अनेक युवक या व्यसनाधीन व्यापारात गुंतले आहे. पोलिसांनी या व्यापारावर आधीच कारवाई करायला हवी होती.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोउपनि कृष्णा दराडे, पोलीस कर्मचारी रामप्रसाद नैताम, आनंद, प्रकाश बल्की, शरद कुडे, जितेंद्र आकरे, मनीषा, जय बारतीने, संदीप, पंकज, सुरेश कोरवार, रवीकुमार, प्रफुल्ल, पंकज, पंकज पोटे यांनी केली.
Leave a Comment