AB Form Distribution : चंद्रपूर ३० डिसेंबर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, कांग्रेस भाजपने पक्षात बंड होऊ नये यासाठी अजूनही अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर केली नाही, मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला आला आहे. (तिकीट न मिळाल्यास बंडखोरी)
NEWS ३४ च्या हाती लागलेल्या माहितीनुसार यादी जाहीर न करता भाजप व कांग्रेस AB फॉर्म वाटणार आहे, सकाळी १० वाजल्यापासून AB फॉर्मचे वाटप होणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांना फोन करून बोलाविण्यात येत आहे. भाजपने मनपा निवडणुकीसाठी सक्रिय नसलेल्याना तिकीट दिल्याची माहिती आहे, ५ वर्षे प्रभागात राबणारे कार्यकर्ते अजूनही फोनची वाट बघत आहे.
भाजपने जो मार्ग अवलंबविला तोच मार्ग कांग्रेसने सुद्धा अवलंबविला आहे, अनेक निष्ठावंतांना कांग्रेसने डच्चू दिल्याची माहिती आहे, आज कांग्रेस व भाजप कार्यालयात निष्ठावंत आपला रोष नेत्यांवर व्यक्त करणार असल्याची माहितीही यावेळी पुढे आली आहे. १० वाजतापासून भाजप व कांग्रेसच्या कार्यालयात राजकीय गोंधळ उडणार आहे. AB Form Distribution
मुनगंटीवार-जोरगेवार वादात अनेकांच्या उमेदवारीवर संक्रांत कोसळली आहे, उमेदवारी अर्ज भरल्यावर कांग्रेस व भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजप व कांग्रेसने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या मात्र चंद्रपुरातील पक्षाच्या अंतर्गत कलहाने अजूनही उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या नाही.
Leave a Comment