"77 लाखांचे Crop Loan वाटप, चंद्रपूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना आर्थिक बळ"

April 29, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - Chandrapur जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताडाळी शाखेअंतर्गत ताडाळी प्रायमारी सेवा सहकारी संस्था क्र. ६५८ मार्फत ५९ सभासदांना एकूण ७७ लाख ३१ हजार रुपयांचे पीक कर्ज Crop Loan वितरित करण्यात आले. या कर्जवितरण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश दादापाटील चोखारे यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. (मुखाच्या कॅन्सर ला थांबविणारी HPV लस मोफत)


यावेळी बोलताना दिनेश चोखारे यांनी शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगत सहकार क्षेत्र शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे नमूद केले. या कर्जामुळे शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आर्थिक बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमराज दिवसे, शाखाधिकारी गजानन भोयर, निरीक्षक रोशन तुरारे, कर्मचारी श्याम चव्हाण यांच्यासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच संस्थेचे गटसचिव सुरेश लोणारे, तसेच सुधीर दिवसे, बाबा जुनघरे, भीमराव मडावी, नथू उगे आदी सभासद व मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पीक उत्पादन वाढीस चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Comment

+