चंद्रपूर: भारताच्या BRICS २०२६ अध्यक्षपदाच्या अनुषंगाने, ब्रिक्स सदस्य देशांतील मान्यवर प्रतिनिधीमंडळाने दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन भारतातील विकसित होत असलेल्या वन्यजीव संवर्धन पद्धती व समुदायाधारित शाश्वत उपजीविका मॉडेल्सचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. १८ व्या ब्रिक्स परिषदेनिमित्त, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT), नागपूर यांनी २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान ‘ब्रिक्स यंग टॅक्स प्रोफेशनल्स वर्किंग ग्रुप – क्षमता वृद्धी कार्यशाळा’ आयोजित केली होती. या कार्यशाळेचा एक भाग म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प BRICS Tadoba Visit भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
भेटीची सुरुवात पहाटेच्या सफारीने झाली, ज्यामध्ये प्रतिनिधींना प्रकल्पातील विज्ञानाधिष्ठित व व्यवस्थापनकेंद्री संवर्धन पद्धतींचा सविस्तर परिचय देण्यात आला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले.
गतिशील परिसंस्थेमध्ये संवर्धनाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने अवलंबलेल्या समन्वित पद्धतीचे प्रतिनिधींनी विशेष कौतुक केले.
समुदाय सहभाग व सांस्कृतिक अनुभव
सायंकाळी प्रतिनिधीमंडळाने ताडोबा परिसरातील स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा गावाला भेट दिली. या भेटीत स्थानिक समुदायांचा संवर्धनातील सहभाग, शाश्वत उपजीविका आणि इको-पर्यटन उपक्रमांची माहिती देण्यात आली.
यानंतर पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले, ज्यातून मध्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले आणि समुदाय व संवर्धन यांच्यातील अतूट नाते अधोरेखित झाले.
संवाद व विचारांची देवाणघेवाण
भेटीच्या शेवटी क्षेत्र संचालक, उपसंचालक (कोर व बफर) तसेच वनाधिकारी यांच्यासोबत संवाद सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात लँडस्केप पातळीवरील संवर्धन धोरणे, मानव–वन्यजीव सहअस्तित्व आणि जैवविविधता संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व यावर चर्चा झाली.
ब्रिक्स प्रतिनिधींनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करत भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदादरम्यान संवर्धन क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारांचेही विशेष अभिनंदन केले. BRICS In Tadoba
ही भेट ब्रिक्ससारख्या जागतिक व्यासपीठांच्या माध्यमातून ज्ञानविनिमय आणि संवर्धन भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा पर्यावरणीय संतुलन राखत समुदाय सहभागासोबत समन्वित वन्यजीव व्यवस्थापनाचे एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे येत आहे. (चवताळलेल्या वाघिणीने वनरक्षकावर केला हल्ला)
Leave a Comment