Shivsena Vanchit Alliance chandrapur : चंद्रपूर 28 डिसेंबर 2025 - चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडी मध्ये फूट पडली, आज शिवसेना ठाकरे व वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली.
दोन्ही पक्षाने 66 जागेपैकी समान जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (चंद्रपुरात 5 उमेदवारी अर्ज दाखल)
28 डिसेंबर रोजी वंचित आघाडी व शिवसेना ठाकरे पक्षातील नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे म्हणाले की आम्ही भाजप विरोधात एकत्र आलो आहे.
यासाठी आम्ही 66 जागेपैकी 33-33 जागेवर निवडणूक लढवीत मनपा वर वंचित-शिवसेनेचा झेंडा फडकविणार,
स्नेहल रामटेके म्हणाले की चंद्रपूर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याने चंद्रपूर मनपाच्या राजकारणात नागरिकांना तिसरा पर्याय मिळाला आहे. Shivsena Vanchit Alliance chandrapur
आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, वंचित आघाडीचे महानगरप्रमुख स्नेहल रामटेके, सतीश भिवगडे, सुरेश पचारे, जयदीप खोब्रागडे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे उपस्थित होते.
Leave a Comment