Leopard attack child death Gadbori : सिंदेवाही, १९ सप्टेंबर – सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी सायंकाळी एका आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
प्रशिक बाबन मानकर (८) असे मृत मुलाचे नाव आहे. तो गावातील मस्कार्या गणपतीच्या सामुदायिक भोजनासाठी गेला होता. रात्री साडेसातच्या सुमारास जेवण झाल्यावर तो आपल्या काकासोबत घराकडे, किल्ला रोडवरून परत येत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घेतली.
शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याने मुलाला जबड्यात पकडले आणि जवळच्या टेकडीकडे ओढत नेले. जमावामध्ये प्रचंड घबराट पसरली. लोकांनी बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशिकला वाचवता आले नाही. त्याचा मृतदेह आज (१९ सप्टेंबर) गडबोरी टेकडीजवळ सापडला. घटना घडल्यावर गडबोरी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती, मागील २ दिवसापासून बिबट परिसरात दिसत होता, याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला माहितीही दिली होती मात्र त्यांनी यावर हतबलता दाखवली. गडबोरी गावातील नागरिक वनविभागवर चांगलेच संतापले होते. Sindewahi leopard attack news
या घटनेमुळे संपूर्ण गावावर दु:खाचे सावट पसरले आहे. दरम्यान, वन विभाग आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये २९ वाघ, २ बिबट व एक अस्वलाच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
संतापलेल्या ग्रामस्थांनी बिबट्याला तात्काळ पकडण्याची आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Comment