मोठ्या भावाला फोन केला अन् म्हणाला, "मी वडिलांना मारलंय"; चंद्रपुरातील धक्कादायक घटना!

February 23, 2026 by Prakash Hande

Son kills father : भिसी (चंद्रपूर) - वडिलांना दारूचे व्यसन, दारू पिल्यावर कुटुंबाला शिवीगाळ व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून लहान मुलाने नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळत खून केला. हि घटना जिल्ह्यातील भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. आधी आरोपी मुलाने वडिलाने स्वतः आत्महत्या केली असल्याचा पाढा पोलिसांसमोर वाचला मात्र पोलिसांचा खाक्या दाखविताच आरोपीने गुन्हा कबूल केला.  (कारल्याची भाजी केली म्हणून मुलाने केली आईची हत्या)

 

चिमूर तालुक्यातल्या भिसी गावातील जुनी वस्तीमध्ये राहणाऱ्या ५१ वर्षीय मच्छिन्द्र आनंदराव मेश्राम यांना दारूचे व्यसन होते, त्यांना दोन मुले आहे, मच्छिन्द्र मेश्राम हे नेहमी दारू पिऊन पत्नी व मुलाला शिवीगाळ व मारहाण करीत होते. २२ फेब्रुवारीला गावात साक्षगंधाचा कार्यक्रम होता, १९ वर्षीय संदेश मच्छिन्द्र मेश्राम हा जेवण वाढण्यासाठी गेला होता, जेवण आटपल्यावर संदेश घरी परतला, त्यावेळी वडील घरी आले नव्हते.

 

रात्री ११ वाजता मच्छिन्द्र मेश्राम हे दारूच्या नशेत घरी आले, त्यावेळी संदेश ने जेवण आणले आहे करून घ्या असे म्हटले मात्र मला अजून दारू प्यायची आहे, मी पुन्हा घेऊन येतो असे म्हटल्यावर मुलाने आता जाऊन नका मात्र वडील ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्यामुळे वडिलांनी मुलाला शिवीगाळी करणे सुरु केले , त्यावेळी संदेश चा राग अनावर झाल्याने घरातील नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळत त्यांना ठार केले. घटनेच्या दिवशी संदेश व मृतक वडील हे दोघेच घरी होते.

 

वडिलांना ठार मारल्याची बाब स्वतः आरोपीने सिंदेवाही तालुक्यात राहणाऱ्या मोठा भाऊ २२ वर्षीय पंचशील मच्छिन्द्र मेश्राम ला फोन करून सांगितली. वडिलांचा खून झाला अशी माहिती मिळाल्यावर पंचशील मेश्राम भिसी मध्ये दाखल झाला, तर त्याने वडील नेहमी दारू पिऊन मला व आईला शिवीगाळ करीत होते म्हणून मी ररागाच्या भरात वडिलांचा गळा आवळला असे संदेश ने भावाला सांगितले.

 

पंचशील ने तात्काळ भिसी पोलिसांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली, ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत संदेश ला ताब्यात घेत विचारपूस केली मात्र त्याने असं काही केले नाही, वडिलाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे सांगितले. सपोनि भोंगाडे यांनी आरोपीला पोलीस खाक्या दाखविताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी संदेश वर पोलिसांनी कलम १०३ (१) अनव्ये गुन्हा दाखल करीत अटक केली. Section 103 BNS

 

संदेश हा रागीट स्वभावाचा होता, लहान-लहान गोष्टीचा त्याला पूर्वीपासून राग यायचा, दारू पिऊन वडील आई व संदेश ला नेहमी शिवीगाळ व मारहाण करायचे याचाच राग कदाचित संदेश च्या मनात असेल म्हणून हि घटना घडली.

  

Leave a Comment

+