वरोरा हादरले: पोटच्या मुलानेच केली वडिलांची हत्या, 'पडले' सांगून बनाव केला

April 29, 2026 by Prakash Hande

वरोरा :- कौटुंबिक वादातून एका पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना वरोरा शहरात घडली, मुलाने आधी घरी पडल्याने जखमी झाले असा बनाव केला मात्र त्यानंतर चौकशीमध्ये पोलिसांनी या घटनेचा उलगडा करीत आरोपीला अटक केली. (नाचताना पायावर पाय पडला, घरगुती कार्यक्रमात शस्त्र निघाले)


 शहरातील मेहता हॉल जवळील ‘चीरघर’ प्लॉट परिसरातील ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,नामदेव जीवतोडे आणि त्यांचा मुलगा गोलू जीवतोडे यांच्यात काही दिवसांपासून घरगुती कारणावरून नेहमीच वाद सुरू होते.  28 एप्रिल 2026 रोजी हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात पियुष उर्फ गोलूने धारदार शस्त्राने वडील नामदेव जीवतोडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. वडील घरावरून पडले असा कांगावा पियुष ने केला, जखमी अवस्थेत नामदेव जीवतोडे यांना चंद्रपूरला नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. 

 

मुलगा पियुष ची चौकशी केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, वरोरा पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यावर Warora Son Kills Father मुलाचा बनाव उधळत त्याला अटक केली. हत्या कोणत्या कारणावरून झाली त्याचे नेमके कारण काय होते, याचा तपास वरोरा पोलीस करीत आहे. पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याने वरोरा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

+