वरोरा हादरले! "माझा फोन का उचलत नाही?" असं विचारत भरदिवसा विवाहितेवर चाकूने सपासप वार!

March 04, 2026 by Prakash Hande

Woman Attacked Chandrapur: वरोरा - माझ्यासोबत बोलत का नाही? माझा फोन उचलत का नाही? असे म्हणताच एकाने विवाहित महिलेवर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले, हि घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात ३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. (रेतीघाटावर भाजप महामंत्री यांची हत्या)

 

जिल्ह्यात सर्वत्र नागरिक होळीची धुळवळ उडवीत होते मात्र दुसरीकडे एक मोठा गुन्हा घडणार होता, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या ६ वर्षांपूर्वी भद्रावती मधील पेट्रोल पंपावर काम करीत होत्या, त्यावेळी त्यांची ओळख विक्की बावणे सोबत झाली होती. अधून मधून विक्की हा राखीला भेटण्यासाठी येत होता सोबतच तो राखीला नेहमी फोन करायचा.

 

विक्की हा वारंवार कॉल करून राखीला त्रास देत होता याबाबत राखीने पती अजय ला हि बाब सांगितली, अजय ने विक्की ला रागवीत पुन्हा कॉल करायचे नाही असा दम दिला. ३ मार्च ला धूलिवंदन च्या दिवशी अचानक विक्की राखीच्या घरी पोहोचला, राखी दरवाजा खोल असा तो ओरडू लागला, त्यावेळी अजय हा घरी होता, विक्की ने घराच्या मुख्य दाराला लाथ मारली, दरवाजा तुटेल या भीतीने राखीने दार उघडले.

 

तू माझा फोन का उचलत नाही, तुझा मर्डर करून टाकीन असे म्हणत त्याने कमरेतून चाकू काढत राखी वर दोन वार केले, राखी चा आरडाओरडा ऐकल्यावर शेजाऱ्याने मदतीकरिता धावले, राखी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अजय लिहीतकर यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये विक्की बावणे विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कलम १०९ (१) अन्वये गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

+