Pombhurna Crime News : पोंभूर्णा (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या खुनाची मालिका सुरु झाली आहे, मुलाने आईला, मुलाने वडिलाला व आता दिराने वहिनीला ठार केल्याची घटना घडली, एकाच महिन्यात ३ हत्येच्या घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या आहे. पोंभूर्णा तालुक्यात नातेसंबंधाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चुलत दिराने आपल्या वहिनीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत महिलेचे नाव संजना थामदेव सोनटक्के (वय ३२) असे असून आरोपीचे नाव धनराज यादव सोनटक्के (३६) रा. चेक खापरी असे आहे. (दारुड्या मुलाने घेतला वडिलांचा जीव)
पोलिसांच्या माहितीनुसार, संजना आणि धनराज यांच्यात मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपीला संजनाचे इतर व्यक्तीसोबतही संबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. रविवारी (दि. २२) रात्री साडेअकराच्या सुमारास धनराजने संजनाला घराजवळील शेतात बोलावून घेतले. तेथे झालेल्या वादानंतर संतापाच्या भरात त्याने संजनाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
घटनेच्या दिवशी संजना चा पती मुलासोबत नवसाच्या कार्यक्रमाला तेलंगणात गेला होता, २३ फेब्रुवारीला थामदेव यांनी पत्नीला मोबाईलद्वारे शुभ सकाळ संदेश पाठविला मात्र त्यांना उत्तर मिळाले नाही, पत्नीला कॉल केला मात्र काही प्रतिसाद आला नाही. दुपारच्या सुमारास थामदेव घरी पोहोचले व पत्नी संजना चा शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही. दुपारच्या सुमारास एका शेतशिवारात पत्नीचा मृतदेह आढळून आला. Pombhurna Crime News
सोमवारी (दि.२३) दुपारी शेतमालकाला शेतात संजनाचा मृतदेह आढळून आल्याने घटना उघडकीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या सहा तासांत आरोपीला जेरबंद केले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांचा पोलिस कोठडी (पीसीआर) सुनावली. पुढील तपास ठाणेदार करीत आहेत.
Leave a Comment