Devendra Fadnavis Roadshow : चंद्रपूर ४ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षात अंतर्गत वाद उफाळला, आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी मुनगंटीवार-जोरगेवार यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळाला होता. पक्षाची अधिकृत यादी जाहीर होताच स्थानिक स्तरावर उमेदवारांची नावे वगळून दुसऱ्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने भाजपात संघर्ष उफाळून आला.
उमेदवारांच्या यादीत बदल पक्षाने थेट महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची हकालपट्टी केली, उमेदवार निवडून येणार कि नाही असा संभ्रम सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा सांभाळत चंद्रपुरात प्रचाराचा नारळ फोडला. ४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा रोड शो आयोजित करण्यात आला.
महाकाली मंदिरात दर्शन घेतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंचलेश्वर मंदिर पासून रोड शो ला सुरुवात केली, चारचाकी वाहनावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अशोक उईके, माजी खासदार हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार करण देवतळे यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि चंद्रपूर व जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलविण्यात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर व आमदार जोरगेवार यांचा मोलाचा सहभाग आहे. १५ जानेवारीला आपण महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून संधी द्या १६ जानेवारीपासून महायुती आपल्या सर्वांची काळजी पुढील ५ वर्षे घेणार. अंचलेश्वर गेटपासून सुरु झालेला रोड शहरातील मुख्य मार्गाचे भ्रमण करीत जटपुरा गेट पर्यंत पोहोचला. Devendra Fadnavis Roadshow
पक्षांतर्गत सुरु असलेला कलह तात्काळ मिटावा यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, ३ जानेवारीला झालेल्या भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीत नेत्यांचा दुरावा मिटल्याचा दावा करण्यात आला अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व हंसराज अहिर हे विरोधक एकत्र आल्याचे चित्र भाजपातील कार्यकर्त्यांना बघायला मिळाले.
Leave a Comment