Immediately declare a wet drought : चंद्रपूर - २३ सप्टेंबर २०२५ - महायुती सरकारने राज्यातील अनेक जिल्ह्यांना ओला दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले चंद्रपूर जिल्हा या घोषणेतून वगळला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
भद्रावती केंद्रीय विद्यालयाची इमारत जीर्ण, खासदार धानोरकर यांची तात्काळ कारवाई
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, घरांची व शेतीमालाची हानी झाली. शेतकरी कर्जबाजारीपणात सापडला असून आर्थिक संकट गडद झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
निवेदनाची प्रत कृषीमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी चोखारे यांनी केली आहे.
Leave a Comment