Free Land Patta Chandrapur : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना मोफत घराचे पट्टे मिळणार आहे, यासाठी शासनाने हालचाली सुरु केल्या असून महिन्याभराच्या आत नागरिकांना आपल्या जागेचा मालकी हक्क मिळणार आहे. याचा सर्वात जास्त फायदा नझुल जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना होणार आहे, यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. चंद्रपूर शहरात नागरिकांना लवकर आपल्या घराचा पट्टा मिळावा याकरिता विठ्ठल मंदिर प्रभागात २७ एप्रिलपासून विशेष शिबीर आयोजित केल्या जात आहे. (रामाला तलावात मृत माश्यावरून खासदार धानोरकर यांचा संताप)
शासकीय योजनांचे शिबीर नगरसेवकांनी आधी करावयाचे असते मात्र याउलट शहरातील कांग्रेस कार्यकर्त्या सौ. राधा प्रफुल पुलगमकर यांनी निवडणुकीत पराभव झाल्यावर सुद्धा सामाजिक कार्य जोपासत विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांसाठी नझूल जागेकरिता हक्काचा पट्टा मिळावा याकरिता २७ एप्रिल ते २ मे २६ पर्यंत विशेष शिबिर नरकेसरी अभ्यंकर शाळेसमोर, डॉ मुळे यांच्या दवाखान्यासमोरील राधा पुलगमकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी वर्ष २०११ पूर्वीची घरटॅक्स पावती, घरापुढे किंवा जागेपुढे काढलेला फोटो, लाईट बिल, राशन कार्ड, ज्यांच्या नावाने पट्टा पाहिजे त्यांचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. हि प्रक्रिया पूर्ण केल्यावर नागरिकांना लवकरच हक्काचे पट्टे मिळणार.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात राधा पुलगमकर हे शिबीर नागरिकांना सदर योजनेचा लाभ मिळावा याकरिता घेण्यात येत आहे. सामाजिक भावनेची जाण म्हणून या शिबिराचे आयोजन केल्या गेले आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबिरात आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन राधा पुलगमकर यांनी केले आहे.
Leave a Comment