District Annual Plan । चंद्रपूरच्या विकासाला गती, पालकमंत्री वुईके यांनी घेतला आढावा

April 25, 2026 by Prakash Hande

District Annual Plan 2026 : चंद्रपूर - सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर नियतव्ययविविध यंत्रणाच्या माध्यमातून करण्यात येणारी विकासकामेत्याची अंमलबजावणी आदीबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला. (मालधक्का हटाव, मूल बचाव, नागरिकांचा एल्गार) 

 

नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीला आमदार देवराव भोंगळेकरण देवतळेजिल्हाधिकारी वसूमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेशउपवनसंरक्षक कुमारस्वामीकुशाग्र पाठकयोगेश वाघायेआनंद रेड्डीप्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुंभरे यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्री डॉ. वुईके म्हणालेएप्रिल ते जून 2026 या कालावधीत यंत्रणांनी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करावे. या प्रस्तावात आपल्या विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात कोणकोणती विकास कामे करण्यात येणार आहे,  त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करणारया बाबींचा समावेश असावा. तसेच विविध यंत्रणांनी जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे.

 

महावितरणने तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गावे 100 टक्के सौर उर्जेवर करावी. कर्ज वितरणाबाबत बँकांची तक्रार येणार नाही. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावेयासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करावे. आकांक्षित तालुका जीवतीमध्ये शिक्षणआरोग्य या बाबींवर विशेष फोकस करावा. क्रीडा विभाग खेळाडू तसेच तरुणांना खेळण्यासाठी दीर्घकाळ टिकेलअशी कामे घ्यावीत. वैद्यकीय रुग्णालयातील सर्व उपकरणे अद्यावत ठेवावी. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात पावसाळ्याच्या दिवसात आवश्यक औषधी उपलब्ध ठेवाव्या. तसेच शुद्ध पिण्याचे पाणीबसण्याची व्यवस्थाशौचालय स्वच्छ ठेवावे. अंगणवाड्यांमध्ये सुद्धा पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था असावी. ज्या गावांना रस्त्यांची अत्यंत गरज आहेअशा गावांसाठी ग्रामीण रस्ते त्वरित करावे. त्यासाठी निधी देण्यात येईल. चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात चांगल्या अभ्यासिका तयार कराव्याअशा सूचना पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या. Chandrapur Development Plan

 

यावेळी आमदार भोंगळे म्हणालेनियमित कर्ज भरणाऱ्यांना बँकांनी लगेच कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. मात्र बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा अग्रणी बँकेने त्वरित बँकांना सूचना कराव्या. सर्व तालुका क्रीडा संकुलामध्ये कुस्ती आणि कबड्डीसाठी मॅट उपलब्ध करून द्यावीअशी मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सादरीकरण केले.

Leave a Comment

+