OBC caste census demand । ओबीसींच्या हक्कांसाठी एल्गार: जंतर-मंतरवर धरणे आंदोलन!
OBC caste census demand । ओबीसींच्या हक्कांसाठी एल्गार: जंतर-मंतरवर धरणे आंदोलन!
January 17, 2026byPrakash Hande
OBC caste census demand
OBC caste census demand :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगणा, आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल 2025 रोजी जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे.
आरक्षणाची 50% मर्यादा हटवावी.
13 सप्टेंबर 2017 पासून प्रलंबित असलेली क्रिमीलेअरची मर्यादा वाढवावी.
तेलंगणातील वाढलेले 42% ओबीसी आरक्षण 9 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे.
संविधानाच्या कलम 243 डी (6) आणि 243 टी (6) मध्ये सुधारणा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षणाचा कायदा करावा.
केंद्र सरकारच्या सर्व विभागांतील ओबीसी संवर्गातील राखीव 27% जागा पूर्णपणे भरण्यात याव्यात. मंडल आयोग आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. ओबीसी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. ओबीसी प्रवर्गासाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची निर्मिती करावी. ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करावा. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्ट गाव योजना लागू करावी. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबी आणि एलएलएमच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना 27% आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने वार्षिक अंदाजपत्रक तयार करताना एससी, एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गाकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी. OBC reservation in local bodies
आंदोलनाचे आवाहन:
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी ओबीसी बांधवांना या देशव्यापी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. National OBC Federation
Leave a Comment