Chandrapur burglary news : चंद्रपूर - शहरातील इंदिरानगर भागात २० दिवसात ३ घरफोडीच्या घटना घडल्या असून आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी कुणालाही अटक केली नसल्याची माहिती आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंदिरा नगर भागातील पंचशील चौकात दोन ठिकाणी घरफोडी झाली होती, १७ फेब्रुवारीला इंदिरा नगरातील मनपा शाळेजवळ पुन्हा घरफाडीची घटना घडल्याने पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. (इंदिरानगर मध्ये एकाच दिवशी दोन घरफोड्या)
३० वर्षीय स्वप्नील देवगडे हे १६ फेब्रुवारीला कुटुंबासह मार्कंडा मधील शिव मंदिरात दर्शनाला गेले होते, दर्शन मध्यरात्री १ वाजता देवगडे कुटुंबासह घरी परतले असता घराचे मेन गेट उघडे होते, सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते. बेडरूम मधील कपाट सुद्धा उघडे होते, घरी चोरी झाला हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी बेडरूम मध्ये जाऊन बघितले तर कपाटातील रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबविला होता. स्वप्नील देवगडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.
यापूर्वी इंदिरा नगर भागात चोरीच्या घटना घडलेल्या आहे, नागरिकांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणीही केली होती मात्र तसे काही न झाल्याने चोरांची हिंमत अधिक वाढली. गुन्हेगारी पोलीस यंत्रणेच्या वरचढ झाली असल्याचे चित्र आता चंद्रपुरात दिसत आहे.
Leave a Comment