Bhadrawati Murder Case : भद्रावती (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यात घरगुती कारणावरून झालेल्या वादात अनेक जीव गेले, फेब्रुवारी महिन्यात हत्येचे सत्र सुरू झाले आहे. सावली, भिसी, पोम्भूर्णा व आता भद्रावती मध्ये झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. (पोम्भूर्णा तालुक्यात प्रेमसंबंधातून महिलेची हत्या)
घरगुती वादात भावाने बहिणीची धारदार शस्त्र सत्तूर ने वार करीत हत्या केली, मुलीला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या आईवर सुद्धा हल्ला केला.
भद्रावती शहरातील झिंगुजी वार्ड मध्ये राहणाऱ्या भोंडे कुटुंबात आज मोठा वाद झाला. सुरज शंकर भोंडे याने रागाच्या भरात बहीण संजीवनी शंकर भोंडे वर सत्तूर ने हल्ला केला, मुलीला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या आईवर सुद्धा सूरज ने हल्ला करीत जखमी केले.
कुटुंबात ऐक्य नव्हते
मिळालेल्या माहितीनुसार सूरज व त्याचे वडील व संजीवनी आणि आई हे दोघे वेगवेगळे राहत होते, त्यांचा स्वयंपाक सुद्धा वेगळा तयार व्हायचा, घटनेच्या दिवशी भाजी हिसकावून घेतल्याचा वाद झाला आणि तो वाद संजीवनी च्या जीवावर बेतला.
या हल्ल्यात 32 वर्षीय संजीवनी चा जागीच मृत्यू झाला. मृतकाची आई गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व भद्रावती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी आरोपी सूरज भोंडे ला अटक करीत पोलीस स्टेशनमध्ये आणले. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे
Leave a Comment