"बाहेर निघा!" चंद्रपूर मनपाच्या पदग्रहण सोहळ्यात १६ नगरसेवकांचा राडा

February 12, 2026 by Prakash Hande

Mayor Inauguration Controversy : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका महापौर पदी भाजपच्या संगीता खांडेकर व उपमहापौर पदावर प्रशांत दानव यांची निवड करण्यात आली, महापौर हे एकमताने तर उपमहापौर हे ईश्वर चिट्ठीने निवडून आले आहे हे विशेष. आज १२ फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान भाजप नगरसेवकांनी घालत बहिष्कार टाकत बाहेर निघून गेले. (आमदार जोरगेवार विरुद्ध सुधीर मुनगंटीवार, महापौर श्रेयवाद पेटला)

 

आज पदग्रहण सोहळ्यात स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना पदग्रहण सोहळ्याचे निमंत्रण न दिल्याने भाजपच्या १६ नगरसेवकांनी यावर आक्षेप घेत विचारणा केली असता ७ नगरसेवकांनी निघा बाहेर असे म्हटले त्यावरून वातावरण चांगलेच तापले. महापौर पदग्रहण सोहळ्यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना बोलाविण्यात आले होते, मात्र स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना डावलण्यात आल्याने १६ नगरसेवक नाराज झाले.

 

भाजप पक्षाचा महापौर चंद्रपूर मनपात काठावर निवडून आल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार हे श्रेयवादावरून आमनेसामने आले, महापौर मी निवडून आणला असा सूर दोन्ही आमदारांनी काढला. आज भाजपचे २३ तर शिंदेसेना १ असे नगरसेवक पदग्रहण सोहळ्याला उपस्थित झाले होते. मुनगंटीवार महापौर दालनात आल्यावर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला, स्थानिक आमदारांना निमंत्रण का देण्यात आले नाही अशी महापौरांना विचारणा करण्यात आली असता बाहेर निघा असे वाक्य मुनगंटीवार समर्थक नगरसेवकांनी म्हटल्यावर वातावरण चांगलेच तापले.

 

१६ नगरसेवकांनी महापौर दालनातून काढता पाय घेतला, भाजप गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनी म्हटले हा स्थानिक आमदाराचा अपमान आहे, विशेष म्हणजे महापौरांनी सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिमा आपल्या दालनात लावत स्थानिक नेतृत्वाला बाहेरचा रस्ता दाखविल्याने आम्ही सभात्याग केला. यावर आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि पक्षातील लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावर पक्ष गंभीर दखल घेणार. Mayor Inauguration Controversy

 

महापौर निवडीत कांग्रेसचे भांडण झाले तर महापौर निवडीनंतर आता भाजपातील अंतर्गत कुरघोडी सुरु झाल्याने पक्षातील वाद आता चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात अल्पमतात असलेल्या महापौरांना नगरसेवक बाहेरचा रस्ता दाखविणार असे चित्र आहे.

Leave a Comment

+