Maharashtra CET practice : चंद्रपूर : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी आणि विधी क्षेत्रातील कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) परीक्षेसाठी प्रभावी तयारी करता यावी, यासाठी युवासेना - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोफत सीईटी महासराव परीक्षा आयोजित करण्यात आली. राज्यभरातील २४,३१५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विशेष बाब म्हणजे, चंद्रपूर विधानसभेने नोंदणीच्या संख्येत संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकावला, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली. Free CET mock test
वन अकादमी मध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर, आप ने केला गंभीर आरोप
चंद्रपूर जिल्ह्यात १,६५० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यानुसार, २९ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० दरम्यान चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील ६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. अकरावी, बारावी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या ८५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. Maharashtra CET practice
✅ विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून देणे – सीईटी ही एक महत्त्वाची प्रवेश परीक्षा असून, त्यात जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी सराव गरजेचा असतो. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाची ओळख होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
✅ मोफत परीक्षा – सर्व विद्यार्थ्यांसाठी संधी – अनेक विद्यार्थ्यांना महागड्या सराव परीक्षांसाठी फी भरणे शक्य होत नाही. त्यामुळे युवासेनेने ही परीक्षा पूर्णपणे मोफत ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी दिली. Maharashtra CET practice
✅ संपूर्ण राज्यभर आयोजन – ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी – ही परीक्षा केवळ महानगरांपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या सर्व परीक्षेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली.
✅ सीईटीसाठी तंत्रशुद्ध तयारी – ही परीक्षा सीईटीच्या प्रश्नसंचावर आधारित होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
📌 श्री साई पॉलिटेक्निक, चंद्रपूर विधानसभा (७१) – ५२७ विद्यार्थी
📌 मौशिम भाई जवेरी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर विधानसभा (७२) – २४५ विद्यार्थी
📌 वेक्टर मॅथ्स क्लास आणि परम ट्युशन, राजूरा विधानसभा (७०) – ८५ विद्यार्थी
एकूण ८५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, ज्यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी आणि फार्मसी क्षेत्रातील प्रवेश परीक्षेचा समावेश होता. Rural student CET help
राज्यातील २४,३१५ विद्यार्थ्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १,६५० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती.
यामध्ये चंद्रपूर विधानसभा (७१) मध्ये तब्बल ५२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी करीत राज्यभरात नोंदणी प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
ही गोष्ट जिल्ह्यासाठी अभिमानाची असून, विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली शैक्षणिक स्पर्धात्मकता आणि अभ्यासाविषयी जागरूकता दर्शवते.
ही परीक्षा उत्तम प्रकारे पार पडावी म्हणून युवासेना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. परीक्षेच्या आयोजनात पुढील मान्यवर उपस्थित होते –
🔹 युवासेना कार्यकारिणी सदस्य: श्री. हर्षल दादा काकडे
🔹 युवासेना विभागीय सचिव: प्राचार्य निलेश बेलखेडे
🔹 शिवसेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर: श्री. संदीपभाऊ गिऱ्हे
🔹 युवासेना सहसचिव व युवती सेना जिल्हा प्रमुख: सौ. रोहिणी पाटील
🔹 युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक, चंद्रपूर जिल्हा: श्री. संदीप (रियाल) पटेल
🔹 जिल्हाप्रमुख युवासेना: श्री. विक्रांत सहारे
🔹 युवासेना सरचिटणीस: सुमीत अग्रवाल
🔹 कॉलेज कक्ष लोकसभा प्रमुख: इंजी. चेतन बोबडे
🔹 युवासेना उपजिल्हा प्रमुख: यशपाल उर्फ बंटी भाऊ कमटम
🔹 युवासेना तालुका चिटणीस: प्रवीण पेटकर
🔹 तालुका प्रमुख: सुरज शेंडे
🔹 शहर प्रमुख: शहबाज शेख
🔹 अनिकेत बेलखोडे, प्रशांत गडाला, उपतालुका प्रमुख विवान रामटेके, युवती सेना उपजिल्हा अधिकारी धनश्री हेडाऊ, युवती जिल्हा चिटणीस रोशनी गोलदार, प्रज्वल आवळे, जय हिरकरे, केतन बेले, सार्थक शिक्रे, हंसराज करोले, श्रीकांत दडमल

युवासेनेच्या या उपक्रमामुळे सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. परीक्षेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे युवासेनेने भविष्यात अशा सराव परीक्षांचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन करण्याचे ठरवले आहे. CET preparation online made easy with Yuva Sena’s initiative
युवासेनेने केलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोफत परीक्षेची संधी मिळाली, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळण्याचा युवासेनेचा उद्देश सफल झाला.
➡️ युवासेनेच्या वतीने भविष्यात अजून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम राबवले जाणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली.
Leave a Comment