चोरांनी चंद्रपूर गाठलं, पण पोलिसांनी सीमा ओलांडली!

January 20, 2026 by Prakash Hande

Grocery Transport Theft : मूल २० जानेवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात किराणा साहित्यासह चारचाकी वाहन चोरून नेल्याची घटना ९ जानेवारीला घडली, या प्रकरणी मूल पोलिसांनी ३ आरोपीसह एकूण २२ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फिर्यादी सुरेश सारडा यांचे चालक रणजित बोबाटे यांनी फिर्यादी यांचे महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक एमएच३४ बिझेड ४४११ मध्ये किराणा साहित्याचा माल भरून नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण राईस मिल परिसरात उभी करून ठेवली होती. वाहनात खाद्य तेल व ईतर साहित्य होते. दुसऱ्या दिवशी चालक बोबाटे राईस मिल परिसरात आला असता त्याठिकाणी चारचाकी वाहन कुठेही आढळून आले नाही. (हे हि वाचा : चंद्रपुरातील बंद घरात आढळला दारूचा साठा)

सदर वाहन अज्ञातांनी चोरून नेले असे लक्षात आल्यावर फिर्यादी सारडा यांनी याबाबत मुल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला, गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे ५ दिवसात मूल पोलीस थेट मध्यप्रदेश राज्यात पोहोचत आरोपीना अटक केली.

आरोपीमध्ये २२ वर्षीय अनुज बबलू सोनी, विजय कृपाल परतेती, अंकित धुर्वे राहणार छिंदवाडा मध्यप्रदेश यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून चोरी केलेली चारचाकी वाहन सह खाद्यतेल व इतर किराणा साहित्य व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन किंमत २२ लक्ष ७१ हजार ५२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोलीस कर्मचारी भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, दिलीप आदे, शंकर बोरसरे, संदीप चुदरी व सायबर पोलिसांनी केली.     

Leave a Comment

+