प्रथमच एकोरी प्रभागात सुशिक्षित महिला उमेदवार; दीपा कासट यांचे नामांकन दाखल

January 17, 2026 by Prakash Hande

Independent Woman Candidate : चंद्रपूर २९ डिसेंबर २०२५ - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अनेक नाराजांनी आपला प्रचार प्रभागात सुरु केला आहे, एकोरी प्रभाग क्रमांक १० मधून सर्वसाधारण महिला गटातून यशश्री फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा ललित कासट यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (चंद्रपुरात भाजप-कांग्रेस उमेदवारांची यादी गुलदस्त्यात)

दीपा कासट यांनी भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली होती, त्यांना अद्यापही AB फॉर्म न मिळाल्याने सध्या अपक्ष म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष बाब म्हणजे एकोरी प्रभागात भाजप ची नेहमी पीछेहाट झाली होती, या प्रभागातून भाजपला मजबूत स्थिती मध्ये आणण्यासाठी दीपा कासट यांनी भाजपला उमेदवारी मागितली.

भाजपात सुरु असलेली स्पर्धा आणि अंतर्गत कलह त्यामुळे पक्षाच्या उमेदवारीची वाट न बघता कासट यांनी मतदारांपर्यंत पोहोचणे सुरु केले, दीपा ललित कासट यांची सामाजिक कार्यात चांगलीच छाप असल्याने त्या मतदारांना नवखा चेहरा नसून ओळखीचा आहे, त्यांनी यशश्री फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कार्य केले आहे. Independent Woman Candidate

नागरिकांसाठी केलेल्या सामाजिक कार्याच्या भरोवश्यावर त्यांनी एकोरी प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांच्या नामांकनाने प्रस्थापित पक्षांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रथमच एकोरी प्रभागात दीपा कासट मुळे सुशिक्षित महिला उमेदवार निवडणूक लढवीत आहे.

Leave a Comment

+