Babupeth bachat gat meeting । समाजपरिवर्तनासाठी महिला बचत गटांची गरज : बाबूपेठ आढावा बैठक

January 17, 2026 by Prakash Hande

Babupeth bachat gat meeting

Babupeth bachat gat meeting : चंद्रपूर १४ सप्टेंबर २०२५ - आज आपण बघतो आहे समाजात महिलांवर होणारे अत्याचार पण त्यावर तात्काळ कठोर शिक्षा झाली अस कधीही झाल नाही म्हणूनच आजची स्त्री घराबाहेर पडायला घाबरत आहे ..शासनाने केवळ महिला सक्षमीकरण कायदा लागू केला मात्र अमलबजावणी शून्य आहे त्यामुळेच आज महिलांच सक्षमीकरण होंन गरजेच आहे तसेच महिलांनी या बचत गटाच्या माध्यमातून विविध लघू उद्योग उभारून कुटुंबाला हातभार लावता येईल ,आपल्या आरोग्याची काळजी आपणच. कश्या पद्धतीने घेतली पाहिजे यासाठी अश्या प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना योग्य मार्गदर्शन करून महिलांनासक्षम करणे गरजेचे आहे.

मातृशक्तीचा अपमान सहन करणार नाही - छबू वैरागडे

आज मी याठिकाणी महिलांची जी भरगच्च उपस्थिती बघतो आहे इतक मोठ महिलाच संघटन करण सोप नसत परंतु हे कार्य चंदाताईनी करून दाखविल त्यामुळे समाज परिवर्तनासाठी चंदाताई सारख्या नेतृत्वाची समाजाला आवश्यकता आहे असे मत बालाजी मंदिर बाबूपेठ येथे बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांनी आयोजित केलेल्या महिला बचत गटाच्या आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक इको प्रो चे अध्यक्ष बंडूभाऊ धोत्रे यांनी व्यक्त केले. women self help groups for micro industry setup

babupeth bachat gat

दरवर्षी बचत गटाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम

प्रस्ताविकेतुन बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांनी बचत गट केवळ पैशाच्या देवाण घेवाणीसाठी नसून सामाजात महिलांवर आज जे अन्याय अत्याचार होत आहे ,आत्महत्येच प्रमाण वाढलेल आहे हुंडाबळीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे ,आजची मुल व्यसनाधीन होत चालली आहे,हे कुठतरी थांबल पाहिजे यासाठी आम्ही दरवर्षी बचत गटाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेत असते.बचत गटातील महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणि बचत गटात सदस्य संख्या मर्यादीत घ्यायचा नियम असल्यामुळे,आम्ही बचत गटाची महाराष्ट्रातून पहिली महिला रणरागिणी नागरी पतसंस्था सुरू केली. हे केवळ मला मिळालेली महिलांची साथ त्यांच माझ्यावर असलेला विश्वास आणि बचत गटाचा प्रामाणिक व्यवहार यामुळेच आम्ही हे करू शकले असे विचार व्यक्त केले.self employment for women through savings groups

यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. तारा जोगी, विशेष अतिथी शैलेशभाऊ जुमडे जितूभाऊ इटनकर, तसेच सर्व बचत गटाच्या अध्यक्ष यांची उपस्थिती होती.सर्व मान्यवराच्या हस्ते बचतगटातील सदस्यां,शिक्षिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सौ. उषाताई इटनकर यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सर्व बचत गटातील महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मेघा बजाईत तर आभार सौ. प्रिया अगडे यांनी मानले.

Leave a Comment

+