चकाचक स्विफ्ट कार अन् आत २५०० देशी दारूच्या बाटल्या! ब्रम्हपुरीत गुन्हे शाखेचा दणका

March 01, 2026 by Prakash Hande

Crime Branch Raid : ब्रम्हपुरी – स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत पो.स्टे. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांना रंगेहात पकडले. मौजा गंगलवाडी टी पॉईंट येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (वाळू तस्करांचा माज, वनरक्षकाला दिली जीवे मारण्याची धमकी)

 

चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अवैध दारूची मोठया प्रमाणात वाहतूक होत आहे, सदर दारू हि चंद्रपूरातून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वाहतुकीद्वारे पुरविल्या जाते, यावर अंकुश लागावं याकरिता चंद्रपूर पोलीस आपल्या परीने कारवाई करीत नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेने २८ फेब्रुवारीला गोपनीय माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजा गांगलवाडी टी पॉईंट मधून अवैध देशी दारूची वाहतूक करीत असलेल्या इसमांवर छापामार कारवाई करण्यात आली. या कारवाईत छाप्यात ९० एमएलच्या देशी दारूच्या २५ पेट्या (एकूण २५०० शिश्या) जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख रुपये आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली MH 36 Z 5665 क्रमांकाची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे.
एकूण जप्त मालाची किंमत ६,००,००० रुपये इतकी आहे. Crime Branch Raid

 

या प्रकरणी पोलिसांनी अमित अशोक दिघोरे (रा. कासवी), अजय दादाजी राऊत (रा. अंतरंजी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली) यांना ताब्यात घेतले असून, सुनील जिभकाटे (रा. आरमोरी, जि. गडचिरोली) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.

उपविभाग ब्रम्हपुरी पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांचा अंकुश कायम असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

 

Leave a Comment

+