BJP Official Candidate Change : चंद्रपूर ३१ डिसेंबर - ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत चंद्रपूर महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, कासनगोट्टूवार यांनी भाजप पक्षातर्फे आलेल्या उमेदवारांच्या यादीत स्थानिक पातळीवर बदल केला. असल्याच्या आरोपावर पक्षशिस्त भंग झाल्याचा ठपका ठेवत हि कारवाई करण्यात आली. (ताडोबा व्याघ्रप्रकल्पात बनावट आधार कार्डाने जंगल सफारी)
उमेदवारी अर्ज वाटपाच्या शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत भाजप उमेदवारांची अधिकृत यादी महानगर अध्यक्ष यांनी जाहीर केली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला होता. AB फॉर्म वाटपात निष्ठावंतांना डावलण्यात आले होते. विद्यमान नगरसेवकांना तिकीट दिली नसल्याने ऐनवेळी त्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली. एकाच प्रभागात चार AB फॉर्म वाटण्यात आल्याने नेमका अधिकृत उमेदवार कोण? असा संभ्रम निर्माण झालं होता.
प्रभाग क्रमांक १ देगो तुकूम मध्ये अनुसूचित जमाती महिला गटातून माया उईके यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती मात्र स्थानिक पातळीवर उईके ऐवजी सरला कुळसंगे यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर सुनील डोंगरे ऐवजी विठ्ठल डुकरे, प्रभाग क्रमांक ३ एमईएल मध्ये पूजा पोतराजे ऐवजी आशा देशमुख, प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प अजय सरकार ऐवजी रॉबिन बिस्वास, प्रभाग क्रमांक ७ जटपुरा मध्ये मनीषा मिथुला महातव, रवि लोणकर ऐवजी शिवसेना रवि आसवानी व शिवसेना भाग्यश्री हांडे, प्रभाग क्रमांक ८ वडगाव मधून सत्यम गाणार ऐवजी रवि जोगी, प्रभाग क्रमांक १० एकोरी वार्ड मधून शुभांगी अनिल दिकोंडवार, मनीष ईश्वर बावणे ऐवजी शिवसेना इसमत रशीद हुसेन व शेख नासिर शेख अहमद.
प्रभाग क्रमांक ११ भानापेठ शीतल कुळमेथे ऐवजी शिवसेना माला पेंदाम, प्रभाग क्रमांक १२ मधून वंदना भागवत, गणेश रामगुंडवार ऐवजी अवीता लडके व राजेंद्र शास्त्रकार, प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ मधून रेखा बबन दातारकर, कुणाल रमेश गुंडावार ऐवजी श्रुती ठाकूर व प्रदीप किरमे, प्रभाग क्रमांक १४ भिवापूर मधून पंचशीला अनुप चिवंडे, हरीश मंचलवार ऐवजी ज्योती जीवने व संतोष जिलेवार, प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ मधून रवि नंदुरकर ऐवजी कल्पना बगूलकर यांना स्थानिक पातळीवर यादीत बदल करून उमेदवारी देण्यात आली. BJP Official Candidate Change
उमेदवारीचा गोंधळ उडाल्यावर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी छाननी प्रक्रियेपूर्वी पुन्हा यादीत बदल करीत प्रभाग क्रमांक ७ जटपुरा व प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर प्रभागातून उमेदवार बदलले. अनेक नाराज उमेदवारांनी चार-चार AB फॉर्म वाट्ल्याचा आरोप केल्यावर कासनगोट्टूवार यांनी AB फॉर्म वाटप करताना काही फॉर्म हरवले असल्याची प्रतिक्रिया दिली.
चंद्रपूर मनपा निवडणुकीत ६६ जागेवर भाजपने ५६, शिवसेना ९ व आरपीआय आठवले गटाला एक जागा दिली मात्र भाजपच्या अधिकृत यादीतून १७ निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी दुसऱ्या उमेद्वारांना संधी दिली, ज्यामध्ये भाजप पदाधिकारी हुसेन यांच्या पत्नीला शिवसेना कोट्यात टाकून उमेदवारी दिली. यामुळे पक्ष श्रेष्ठीला नेमकी स्थिती समजल्यावर त्यांनी तात्काळ मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची हकालपट्टी केली.
Leave a Comment