WCL area bear attack incident : भद्रावती: चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) भद्रावतीजवळ काल, २९ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्यावर अस्वलाने (Bear Attack) हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने (Forest Department) तात्काळ या अस्वलाला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महावितरण देणार २४ तास वीज पुरवठा, रणनीती ठरली
आनंदराव मारोती ढवस (वय ६७, रा. तिरवंजा) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव ढवस हे काल सायंकाळी आपल्या शेतातील कामे आटोपून घराकडे परतत होते. भटाळी वेकोली (WCL) परिसरातील डम्पिंगजवळ दबा धरून बसलेल्या एका अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आनंदराव यांच्या चेहऱ्यावर आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. bear attack on farmer
हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने चंद्रपूर सामान्य रुग्णालयात (Chandrapur General Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात (Nagpur Private Hospital) रेफर करण्यात आले आहे.
या घटनेमुळे भद्रावती आणि वेकोली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अस्वलाच्या हल्ल्याची भीती वाढली आहे. शेतात काम करण्यासाठी जाणेही आता धोक्याचे झाले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. वनविभागाने या अस्वलाला लवकरात लवकर जेरबंद करून शेतकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Leave a Comment